HomeArchiveईश्वराची आळवणी करत...

ईश्वराची आळवणी करत साजरा झाला मेहफिल ए जहांगिरीमध्ये होलिकोत्सव!

Details
ईश्वराची आळवणी करत साजरा झाला मेहफिल ए जहांगिरीमध्ये होलिकोत्सव!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मानवतेच्या कल्य़ाणासाठी आयुष्य व्यतित केलेल्या ख्वाजा सूफी मजिदूल हसन शाह यांच्या शिकवणीनुसार अॅण्टॉप हिल येथील मेहफिल ए जहांगिरिया येथे सज्जादा नसीन डॉ. सूफी फैजुल हसन शाह यांच्या मार्गदर्शनानुसार ईश्वराची आळवणी करत हिंदू बंधूंना होळीच्या शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानुसार कव्वालीचा विशेष सूफी संगीतमय कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आला होता. त्यात अनेक नामांकित सूफी गायकांनी सहभाग घेतला. अल्लाह आणि राम तसेच होळी यांची सांगड घालणाऱ्या काव्यरचनांमुळे उपस्थित भारावून जात होते. एक वेगळेच चैतन्य आणि आनंद यानिमित्ताने उपस्थितांनी अनुभवला.

याबाबत बोलताना सज्जादा नसीन डॉ. सूफी फैजुल हसन शाह यांनी सांगतिले की, प्रत्येक धर्मांमधील सण हा प्रत्येकांमध्ये स्नेह वृद्धींगत करत असतो, यानिमित्ताने सगळ्यांच्या हृद्यात प्रेमभाव जागरूक होत असतो आणि त्यातून एक चैतन्यमय व सकारात्मक वातावरण समाजात निर्माण होते. हेच मानवतेच्या विचारांना प्रोत्साहित करत असते. त्यामुळेच हिंदू बांधवांच्याही होळीच्या सणामधून हा संदेश देण्याचा प्रयत्न होतो. वाईट विचारांचे दहन करून चांगल्या आणि सकारात्मक विचारांकडे समाजाला वळविण्याचा हा सण आहे. ही सूफी पंरपरा ख्वजा गरीब नवाझ अजमेरी, हजरत निजामुद्दिन औलिया, अमीर खुस्रो यांच्यापासून अनेक वर्षे चालत आलेली आहे. यात मुस्लिम बंधूदेखील उत्साहाने सहभागी होत असतात. मेहफिल ए जहांगिरिया ही वास्तू नेहमीच सूफीवादाचा पुरस्कार करत असून त्यातून अखिल मानवतेसाठी कार्य केले जाते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content