HomeArchiveईशान्येकडील 'इंफाळ' भारतीय...

ईशान्येकडील ‘इंफाळ’ भारतीय नौदलाच्या रडारवर!

Details
ईशान्येकडील ‘इंफाळ’ भारतीय नौदलाच्या रडारवर!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
मणिपूर राज्याच्या राजधानी ‘इंफाळ’चं नाव भारतीय नौदलाच्या एका बोटीला नुकतंच दिलं गेलं. देशाच्या पूर्वोत्तर भागाला अन्य भागाशी जोडण्याचा हा प्रयत्न झालाय. लष्कराच्या भूदलाशी निगडीत ‘गोरखा रायफल्स’द्वारे पूर्वोत्तर भागाशी संधान जोडलं असलं तरी आयएनएस कोलकाता वगळता या भागातील नावं नौदलाच्या ‘रडार’वर आली नव्हती. बहुधा, पहिल्यांदा हे घडलंय. याचं श्रेय म्हंटलं तर मोदी सरकारला आहे. पूर्वेकडील राज्यांना झुकतं माप देत देशाच्या अन्य भागाशी जोडण्याचा इरादा प्रथमपासून जाहीर केला होता. यासाठी खास पूर्वोत्तर मंत्रालय स्थापन करून स्वतंत्र मंत्र्यांची नियुक्तीही केली गेली. गेल्या ७० वर्षांत हे झालं नव्हतं.

`इंफाळ′ नावाला काही इतिहासदेखील आहे. मणिपूर राज्याच्या पश्चिमेस बांगला देश तर पूर्वेस लागून म्यानमार देश आहे. वरच्या उत्तरेच्या भागात आसाम आहे. तेच मणीपूरचे प्रवेशद्वार आहे. त्रिपुरातूनही इथे येता येतं. राज्याच्या मध्यभागी असलेला मैदानी प्रदेश नि भोवतालचा पर्वतीय प्रदेश असे मणीपूरचे दोन भाग पडतात. या राज्यातील नद्या उत्तरेकडून, ईशान्येकडून वाहत येत दक्षिणेकडे जातात. मात्र, त्या आकाराने, लांबीने फारशा मोठया नाहीत. नाअंबोल, इरील, नंबुल, थोबाल, इंफाळ, अशी त्यांची नावं आहेत. मध्यभागी असलेल्या ‘लोकटाक’ सरोवरकडे यातील इंफाळ, इरील, थोबल वाहत जातात. पण, सरोवरात सामील नाही होत.

या राज्याला आर्य, महाभारत काळापासून इतिहास आहे. इंग्रज आगमनापासून, असलेल्या गटांच्या सत्ता स्पर्धेचा फायदा घेऊन मणिपूर त्यांनी ताब्यात घेतलं. त्यावेळच्या युवराज टिकेंद्रजीत नि सेनापती खांगल यांना इम्फाळच्या पोलो मैदानात फाशी देऊन कुलचंद या शेवटच्या राजाला हद्दपार केलं गेलं. अन्य एका स्रोतातून उपलब्ध माहितीनुसार इंफाळ शहराने दुसऱ्या महायुद्धात रणभूमी म्हणून सहभाग नोंदवला होता. मणीपूरचे मुख्यमंत्री नोंगथोम्बाम बिरेनसिंग यांनी राजधानी इंफाळच्या या उचित गौरव नि आठवणीबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत. या नामकरणाने ओळख जगाला झाली, असेही ते म्हणाले. ८ मार्च ते ३ जुलै १९४४ दरम्यान झालेल्या लढाईत ब्रिटिशांनी जपानवर विजय मिळवला. येथील ‘कांगला प्रासाद’ हे राजकारण केंद्र आता पडझड अवस्थेत आहे. ईशान्येकडील गुवाहाटी, आगरतळापाठोपाठ तिसरा वर्दळीचा विमानतळ म्हणून इम्फाळची ओळख आहे.

भारतीय नौदलात विविध स्थानं, नद्या, वैयक्तिक शस्त्र यासह जुन्या नौकांच्या आठवणींची नावं दिली जातात. गेल्या शनिवारी या इंफाळ नौकेचं जलावतरण झालं असलं तरी ती प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्यास दोन वर्षांचा कालावधी जाणार आहे. नाना शस्त्रसंभार चढवून, तिच्या चाचण्या होऊन, मग ती नौदलात सामील होईल. लक्ष्य निर्धारित क्षेपणास्त्र डागण्याची, शत्रूच्या रडारपासून स्वतःचे रक्षण करीत (स्टीलथ सिस्टिम),दोन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर वाहून नेण्याची क्षमता, अशी विशाखापट्टणम श्रेणीतील तिसरी नौका दाखल झाली. यापूर्वी विशाखापट्टणम २०१५ सह मौर्मुगाव २०१६ पाण्यात आली आहे. तर ‘पोरबंदर’ पाण्यात येण्याच्या मार्गावर आहे. शत्रूच्या रडारला चकवा देण्याची क्षमता, त्याचबरोबर वैशिष्ट्यपूर्ण डेक रचना, अत्याधुनिक सेन्सर, व्हर्टिकल लॉन्च मिसाईल यंत्रणा, जमीन, हवा, पाणी यात मारा करण्याची क्षमता हीदेखील खासियत सांगितली जाते. मात्र, यापुढील बोटींना कोणती नावं असतील नि देशाच्या कुठल्या भागाला प्रतिनिधित्व मिळेल हे संबंधित समिती ठरवेल. तोपर्यंत आपण नौदलाला शुभेच्छा देऊया.. जय हिंद!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content