Details
इराणी संघर्षाची झळ!
01-Jul-2019
”
अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी
[email protected]
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दोन दिवसांपूर्वी जागाला मोठा धक्का दिला. इराणवर हल्ला चढवण्याचे आदेश मी सैन्य दलाला दिले होते, पण प्रत्यक्ष हल्ला होण्यासाठी दहा मिनिटे वेळ उरलेला असताना मी माझे आदेश मागे घेतले, हल्ला रोखला, युद्ध टाळले. पण स्थिती पूर्ण सुधारलेली नाही हेही ट्रंप यांनी जाहीर केले. अमेरिकेचे अध्यक्ष हे सर्व महत्त्वाच्या गोष्टी व निर्णय ट्वीटरवरून जाहीर करत असतात. त्यानुसार त्यांनी इराणी युद्धाचे रणशिंगही ट्वीटरवरूनच फुंकले आहे. ट्रंप यांच्या या गौप्यस्फोटाने युद्ध टळले याचे हायसे वाटण्याऐवजी युद्ध जवळ आले अशीच भावना जगात व्यक्त झाली. खनिज तेलाचे भाव तातडीने कडाडले तर जगभरातील सर्वच शेअर बाजारांत मोठी पडझड झाली. भारताचे यात मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
इराण हा देश आपल्याला वस्तू विनिमयाच्या व रूपयात पैसे देण्याच्या सोयीसह पुष्कळ तेल पुरवणारा मित्र देश आहे. पण अमेरिकेने निर्बंध जारी केल्यानंतर भारताने ही सोयीची इराणी तेल आयात बंद केली आहे. इराणने अण्वस्त्र विकास कार्यक्रम थांबवावा यासाठी अमेरिकेने सध्याची युद्धाची धमकी दिलेली आहे. यातील मूळ कथा बरीच गुंतागुंतीची आहे. गेली 65 वर्षे अमेरिका व इराणमध्ये कुरबुरी सुरू आहेत. साऱ्या संघर्षाचे मूळ होते प्रचंड अशा इराणी तेलसाठ्यांवरील नियंत्रण. अमेरिकन कंपन्यांचा मक्ता मोडून काढून तेलाचे राष्ट्रीयीकरण कऱण्याचा प्रयत्न 1957 मध्ये पहिले लोकनियुक्त पंतप्रधान मोहंमद मोसाडेक यांनी केले तेंव्हा सीआयए सक्रीय झाली आणि त्यांनी मोसाडेक यांनाच पदच्युत केले. नंतर वीस एक वर्षे अमेरिकेचा मित्र इराणचा बादशहा पहलवी याने राज्य केले. 1979 मध्ये जनतेच्या उठावामुळे त्याला अमेरिकेत परागंदा व्हावे लागले. त्याची हजारो कोटी डॉलर्सची अमेरिकेत दडवलेली संपत्ती परत मागण्यास आयातोल्ला खोमेनी या इराणी क्रांतीच्या धर्मगुरू नेत्याने सुरूवात केली तेव्हा अमेरिकेने इराणबरोबरचे सारे राजनैतिक संबंध तोडले. तिथून पुढे इराणविरोधात अमेरिका अधिक सक्रीय झाली.
साधारण तीस वर्षांपूर्वी जुलै 1988 मध्ये अमेरिकेच्या युद्धनौकांनी तेहरानकडे निघालेले एक प्रवासी विमान लढाऊ विमान आहे अशा समजुतीने उडवले. त्यात 288 प्रवासी मारले गेले ते बहुतेक सारेच इराणी होते व सौदीमध्ये हजयात्रा करून परत येत होते. हा संघर्ष इ. स. 2000 पासून तीव्र झाला. इराण अण्वस्त्र बनवत आहे अशी ओरड तिथल्या खोमेनी विरोधकांनी सुरू केली. अमेरिका, संयुक्त राष्ट्रे आणि युरोपिअन युनियन यांनी इराणचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष मोहंमद अहमदीन एजाद यांच्या सरकारच्या विरोधात पुष्कळ आर्थिक निर्बंध लादले. त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था रसातळाला गेली खरी पण अमेरिकेच्या विरोधात लढण्याचा त्यांचा निर्धार तीव्र झाला आहे. अमेरिकेने युद्धाची तयारी सुरु केली तेव्हा इराणने धमकी दिली की एक जरी गोळी आमच्या दिशेने अमेरिकेने सोडली तरी सारी अमेरिका बेचिराख करू टाकू. बराक ओबामांनी त्यांच्या कार्यकाळात इराणी शांततेसाठी प्रयत्न केले. पण त्यांनी जो अणुकरार इराणबरोबर केला त्यामुळे अमेरिकेचे आणि जगाच्या शांततेचे नुकसानच झाल्याचा आरोप सध्या ट्रंप करत आहेत. इराण अजिबातच नरमलेले नाही. अण्वस्त्र कार्यक्रम त्यांनी बंद तर केलाच नाही उलट त्यांच्याकडील परिष्कृत युरोनियमचा साठा आज सर्वाधिक बनलेला आहे असे इराणनेच जाहीर केले आहे.
गेल्या महिन्याभरात इराणजवळचे सागरी मार्गही धोकायदयक बनले आहेत. पर्शिअन गल्फमध्ये दोन तेलवाहू जहाजांवर क्षेपणास्त्र पडलेलीच आहेत. आता ड्रोन पाडण्यात आले आहे. त्यामुळे पर्शिअन गल्फ, होर्मूजचे आखात आणि ओमानचे आखात हा सारा सागरी प्रदेश म्हणजे युद्धभूमी ठरत आहे. कालपासून भारतासह जगभरातील सर्व विमान कंपन्यांनी या भागातून विमान उड्डाणेही बंद केली आहेत. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेचे एक टेहळणी विमान इराणने जमिनीवरून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने पाडून टाकले तेव्हापासून युद्धज्वर चढतोच आहे. आपल्या डोळ्यांसमोर तरळणारे लहानसहान असे हे ड्रोन नव्हते. हे एक महाकाय विमानच होते. त्याच्या दोन पंखांमधील लांबी 130 फूट, रूंदी 44 फूट आणि वजन बारा टन! हे महाकाय टेहळणी उपकरण जमीन व पाणी यांच्या डोक्यावरून तब्बल अठरा किलोमीटर, साठ हजार फूट उंचावरून उडते. या आरक्यू-4 ग्लोबल हॉक टेहेळणी उपकरणावर हरतऱ्हेची टेहेळणी उपकरणे, प्रभावी कॅमेरे, सेन्सर, दिवसा वा रात्री ढगांआडून पावसा वादळातही जमिनीवरची सारी दृष्ये टिपण्याची क्षमता होती. त्याची किंमत आहे फक्त 220 मिलिअन डॉलर्स म्हणजे पंधराशे बत्तीस कोटी रूपये फक्त!
इराणी अधिकाऱ्यांचे म्हणणे असे आहे की त्यांनी अमेरिकेला अशाप्रकारे हेरगिरी टेहेळणी करणारी याने पाठवू नका असे इशारे दिले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे आम्हाला कृती कऱणे भाग पडले. पण ही कृती व्यापारी विमान कंपन्यांना, हावाई प्रवाशांच्या पोटात गोळा आणणारीच आहे. हा जो सारा पट्टा आहे तो हवाई वाहतुकीच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक गर्दीचा हवाई मार्ग आहे. पूर्व-पश्चिमेला जाणाऱ्या साऱ्या विमानांना इराणी हवाईहद्दीतूनच प्रवास करावा लागतो. अमेरिकेच्या नागरी विमान वाहतूक नियंत्रकांनी तातडीने अमेरिकन हवाई कंपन्यांना या भागातून प्रवास टाळण्याचा सल्ला दिला. कारण जेव्हा इराणने क्षेपणास्त्र डागले तेव्हा त्या परिसरातून अनेक व्यापारी विमाने जात येत होती. ड्रोनपासून 45 नॉटिकल मैल अंतरावरून दोन नागरी विमाने उडत होती. त्यापैकी कुणाचाही बळी इराणी क्षेपणास्त्र सहजच घेऊ शकली असती. दीड वर्षांपूर्वी मलेशियाच्या एका नागरी प्रवासी विमानाला असेच युक्रेनच्या हवेत क्षेपणास्त्राने लक्ष्य केले होते. त्यात 298 प्रवासी व विमान कर्मचारी ठार झाले होते. इराणी अवकाशातून उडणाऱ्या विमानांना अशाच प्रकारचा धोका संभवतो. त्यामुळे भारताच्या हवाई वाहतूक नियंत्रकांनी, डीजीसीए यांनीही, असाच सल्ला भारतीय विमान कंपन्यांना दिला आहे. शनिवारपासूनच अशी उड्डाणे बंदही झाली आहेत.
जागतिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आल्याचेच हे निदर्शक आहे. अशाप्रकारच्या तिसऱ्या हवाई क्षेत्र उड्डाण बंदीचा फटका भारतीय कंपन्यांना बसला आहे. आधी आखाती देशातील अरब राष्ट्रांनी कतारवर निर्बध लागले होते. पिरणामी तिथून जाणारी विमाने वळवावी लागली होती. गेल्या पेब्रुवारीतील बालाकोट हवाई हल्ल्यांनतर पाकने आपली हवाई सरहद्द बंद करून टाकली. आता इराणवरील ही युद्धाच्या सावटातील बंदी आलेली आहे. त्यामुले व्यापारी विमानांची भाडी अधिक कडाडणार आहेत. पाक बंदीमुळे भारतातून विशेषतः दिल्लीहून उड्डाण करणाऱ्या व युरोप, अमेरिकेकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिकचा भार सहन करावा लागत आहे. आता ही सारी विमाने आणखी दक्षिणेकडून वळसा घेऊन मग अमेरिका वा युरोपकडे जाणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो व किंमतही सहाजिकच वाढते.”
“अनिकेत जोशी, संपादक, बित्तंबातमी