Details
आमदार डॉ. भारती लव्हेकर ट्विटरवर लोकप्रिय
25-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
आजकाल समाज माध्यमांतून नागरिक आपल्या मतदारसंघाच्या नेत्यांबद्दल चर्चा करत असतात. आपल्या शहरातील कामांबद्दल समाज माध्यमांमध्ये जागृत असतात. फेसबूक आणि ट्विटरवर आपल्या शहरांतील कामांची चर्चा होत असते. अशाच चर्चांमधून मुंबईतल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर या काही दिवसांमध्ये ट्विटरवर ट्रेण्ड बनल्या आहेत.
२१ सप्टेंबर रोजी #BharatiLavekarVersovaMLA हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला. त्यांच्या विविध विकासकामांचे कौतुक होत असून यात जनसामान्यांचा बराच वाटा आहे. भारती लव्हेकर यांनी गेल्या ५ वर्षांमध्ये वर्सोवा मतदारसंघात विकासकामांची श्रृंखला तयार केली आहे. वर्सोवा समुद्र किनारपट्टी आणि लोखंडवाला तलावावरील स्वच्छता अभियानातील सातत्यामुळे किनारपट्टी आणि तलाव नेहमीच स्वच्छ असतात. यामुळे हे पर्यटनासाठी आकर्षक स्थळ बनलं आहे. सोबतच जनसामान्यांकडून या जागा मॉर्निंग वॉक आणि योगासनांसाठीही वापरल्या जातात. डॉ. लव्हेकर यांनी आपले पर्यावरणप्रेम जपत स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसादही मिळाला.
डॉ. लव्हेकर टी फाउंडेशनच्या अध्यक्षा असून या संस्थेमार्फत त्यांनी वर्सोवामध्ये मोफत सॅनेटरी नॅपकीन वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अनेक गरजू महिलांना हे सॅनेटरी नॅपकीन कीट मोफत देण्यात येत आहे. सोबतच मासिक पाळीविषयी जनजागृती केली जात आहे. महिलांच्या मासिक पाळीसंदर्भातील गरजा लक्षात घेता, शाळा व महाविद्यालयांमध्ये पॅड वेन्डिंग मशिनसुद्धा देण्यात आल्या आहेत. तसेच, भारतातील पहिली पॅड बँक डॉ. भारती लव्हेकर यांच्या नेतृत्त्वात वर्सोवामध्ये सुरू करण्यात आली आहे. महिला वर्गाकडून या मोठ्या पावलाचे कौतुक करण्यात येत आहे. समाज माध्यमांध्ये डॉ. भारती लव्हेकर यांना ‘पॅड वुमन ऑफ वर्सोवा’ म्हटलं जात आहे.
शहर सुंदर बनवण्याच्या आणि शहराला वेगळी ओळख देण्याच्या उद्देशाने लोखंडवाला कारंजा आणि आय लव्ह लोखंडवाला स्पॉट बनवण्यात आले आहे. ही दोन्ही ठिकाणे नागरिकांसाठी, विशेषतः तरूणांसाठी आकर्षक केंद्र बनली आहेत. तरूण मंडळी सेल्फी घेण्यासाठी आवर्जून येथे येतात आणि समाज माध्यमात आपल्या शहराचे कौतुक करत आहेत. या ट्विट्समुळे डॉ. भारती लव्हेकर समाज माध्यमांत प्रकाशझोतात आल्या आहेत. त्या मतदारसंघात नेहमीच सक्रिय असतात. नागरिकांनी केलेले कौतुक त्यांच्यासाठी अतिशय मोलाचे आहे. समाज माध्यमांमध्ये नागरिकांकडून झालेलं हे ट्रेंडिंग डॉ. भारती लव्हेकर यांच्या यशस्वी कार्याची ग्वाही देतात.
”
केएचएल न्यूज ब्युरो
आजकाल समाज माध्यमांतून नागरिक आपल्या मतदारसंघाच्या नेत्यांबद्दल चर्चा करत असतात. आपल्या शहरातील कामांबद्दल समाज माध्यमांमध्ये जागृत असतात. फेसबूक आणि ट्विटरवर आपल्या शहरांतील कामांची चर्चा होत असते. अशाच चर्चांमधून मुंबईतल्या वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर या काही दिवसांमध्ये ट्विटरवर ट्रेण्ड बनल्या आहेत.
२१ सप्टेंबर रोजी #BharatiLavekarVersovaMLA हा हॅशटॅग ट्रेण्ड झाला. त्यांच्या विविध विकासकामांचे कौतुक होत असून यात जनसामान्यांचा बराच वाटा आहे. भारती लव्हेकर यांनी गेल्या ५ वर्षांमध्ये वर्सोवा मतदारसंघात विकासकामांची श्रृंखला तयार केली आहे. वर्सोवा समुद्र किनारपट्टी आणि लोखंडवाला तलावावरील स्वच्छता अभियानातील सातत्यामुळे किनारपट्टी आणि तलाव नेहमीच स्वच्छ असतात. यामुळे हे पर्यटनासाठी आकर्षक स्थळ बनलं आहे. सोबतच जनसामान्यांकडून या जागा मॉर्निंग वॉक आणि योगासनांसाठीही वापरल्या जातात. डॉ. लव्हेकर यांनी आपले पर्यावरणप्रेम जपत स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेला नागरिकांकडून मोठा प्रतिसादही मिळाला.
“डॉ. लव्हेकर टी फाउंडेशनच्या अध्यक्षा असून या संस्थेमार्फत त्यांनी वर्सोवामध्ये मोफत सॅनेटरी नॅपकीन वाटप करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अनेक गरजू महिलांना हे सॅनेटरी नॅपकीन कीट मोफत देण्यात येत आहे. सोबतच मासिक पाळीविषयी जनजागृती केली जात आहे. महिलांच्या मासिक पाळीसंदर्भातील गरजा लक्षात घेता, शाळा व महाविद्यालयांमध्ये पॅड वेन्डिंग मशिनसुद्धा देण्यात आल्या आहेत. तसेच, भारतातील पहिली पॅड बँक डॉ. भारती लव्हेकर यांच्या नेतृत्त्वात वर्सोवामध्ये सुरू करण्यात आली आहे. महिला वर्गाकडून या मोठ्या पावलाचे कौतुक करण्यात येत आहे. समाज माध्यमांध्ये डॉ. भारती लव्हेकर यांना ‘पॅड वुमन ऑफ वर्सोवा’ म्हटलं जात आहे.”
“शहर सुंदर बनवण्याच्या आणि शहराला वेगळी ओळख देण्याच्या उद्देशाने लोखंडवाला कारंजा आणि आय लव्ह लोखंडवाला स्पॉट बनवण्यात आले आहे. ही दोन्ही ठिकाणे नागरिकांसाठी, विशेषतः तरूणांसाठी आकर्षक केंद्र बनली आहेत. तरूण मंडळी सेल्फी घेण्यासाठी आवर्जून येथे येतात आणि समाज माध्यमात आपल्या शहराचे कौतुक करत आहेत. या ट्विट्समुळे डॉ. भारती लव्हेकर समाज माध्यमांत प्रकाशझोतात आल्या आहेत. त्या मतदारसंघात नेहमीच सक्रिय असतात. नागरिकांनी केलेले कौतुक त्यांच्यासाठी अतिशय मोलाचे आहे. समाज माध्यमांमध्ये नागरिकांकडून झालेलं हे ट्रेंडिंग डॉ. भारती लव्हेकर यांच्या यशस्वी कार्याची ग्वाही देतात.”