HomeArchiveआधुनिक `चाणक्य' देवेंद्र...

आधुनिक `चाणक्य’ देवेंद्र फडणवीस बनले ‘विक्रमवीर’!

Details
आधुनिक `चाणक्य’ देवेंद्र फडणवीस बनले ‘विक्रमवीर’!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

योगेश वसंत त्रिवेदी
[email protected] .com

भारतीय जनता पार्टीच्या घटना दुरूस्तीची मुंबई येथील नरीमन पॉईंटवरच्या यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात दोन दिवसांची बैठक होती. 2013 हे साल होतं. नितीन जयराम गडकरी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते तर महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष होते सुधीरभाऊ मुनगंटीवार. घटनादुरूस्तीच्या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष या पदावर असलेल्या व्यक्तीला म्हणजेच नितीनभाऊ गडकरी यांना आणखी एक टर्म वाढवून देण्याची घटनादुरूस्ती मंजूर करण्यात आली. हीच दुरूस्ती प्रदेशाध्यक्षपदालाही लागू करण्यात आली. गडकरी राष्ट्रीय अध्यक्षपदावर आणखी तीन वर्षे राहणार होते आणि सुधीरभाऊंनाही तीन वर्षे ओघानेच मिळणार होती. नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर एक कपोलकल्पित आरोप झाल्यानं राजीनामा दिला आणि राजनाथ सिंह यांच्याकडे भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा आली. परंतु महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदावर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना आणखी तीन वर्षे ठेवण्यास जेष्ठ नेते गोपीनाथराव मुंडे यांनी विरोध केला. सुधीरभाऊंनी पक्षश्रेष्ठींना सांगितले की, तुम्ही मला प्रदेशाध्यक्षपदावर ठेवा किंवा हटवा मी पक्षात एकनिष्ठेने राहीन पण मुंडे साहेबांचा मान राखा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे उत्तराधिकारी म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी पक्षाचे आमदार देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाची शिफारस केली. मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव सुचविल्यामुळे राजकीय वर्तुळात फडणवीस हे गडकरी गटाचे, पण मुंडे यांनी कसे सुचविले, अशी चर्चा सुरू झाली. अर्थात इथेच देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय कारकीर्दीला कलाटणी मिळाली.

देवेंद्र हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ना ते गडकरी गटाचे की ना तर ते मुंडे गटाचे. देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदावर वर्णी लागली आणि एक वेगळे वातावरण उत्साहात सुरू झाले. मुनगंटीवार आणि फडणवीस दोन्ही विदर्भातले तसेच पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते. त्यामुळे परस्पर सहकार्य, सामंजस्य आणि समन्वयाने कार्य सुरू झाले. तोवर भारतीय जनता पक्षाने 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून नरेंद्र दामोदरदास मोदी यांचे नाव निश्चित केले होते. 2013 ते 2014 असे वर्षभर गुजरातचा हा धडाकेबाज मुख्यमंत्री प्रचार व प्रसारासाठी संपूर्ण देशभर झंझावात निर्माण करता जाहला.

मार्च 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी शिवसेना-भाजपा-रिपब्लिकन पार्टी-शिवसंग्राम-स्वाभिमानी शेतकरी संघटना-राष्ट्रीय समाज पार्टी अशा सहा पक्षांची महायुती तयार करीत रामदास आठवले, राजू शेट्टी, महादेव जानवर व विनायक मेटे यांना सोबत घेतले. एकनाथ खडसे तेव्हा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. नितीन गडकरी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळले असल्याने ओघानेच केंद्रीय नेतृत्त्वात गणले जात होते. लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. देशात 543 पैकी 282 जागा भाजपाने पटकावल्या. महाराष्ट्रात 48 पैकी तब्बल 42 जागा जिंकल्या होत्या. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार होते आणि त्यांच्याबरोबर मंत्रीमंडळपण अस्तित्त्वात येणार होते. गडकरी आणि मुंडे हे केंद्रात मंत्री होणार ही सर्वांनाच अपेक्षा होती. कारण गडकरी हे नागपुरात तर मुंडे हे बीडमधून जबरदस्त मताधिक्य घेऊन निवडून आले होते. 26 मे 2014 रोजी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांमध्ये नितीन गडकरी याचे नांव होते पण गोपीनाथ मुंडे यांचे नाव नव्हते. गोपीनाथरावांना हे कळताच 20-22 मे 2014 च्या दरम्यान त्यांनी नवे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना तातडीने नवी दिल्लीत बोलावून घेतले. मुंडे यांचा केंद्रात समावेश होत नसेल तर त्याचा महाराष्ट्रात योग्य संदेश जाणार नाही. मुंडे-फडणवीस-खडसे यांची चर्चा झाली. पण मोदींना सांगणार कोण? ठरले प्रदेशाध्यक्ष या नात्याने देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांची भेट घेणार! ठरल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष भावी पंतप्रधान व भाजपा संसदीय पक्षाचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांना भेटले. काय कसं काय? असा नमस्कार-चमत्कार झाल्यावर मोदी फडणवीस यांच्यात झालेला समजलेला तो संवाद असा…
फडणवीसः नमस्कार मोदीसाहेब
मोदीः नमस्कार, बोला!
फडणवीसः मोदीसाहेब, मंत्रीमंडळात तुमच्या समवेत गोपीनाथ मुंडे यांचे नाव असेल असं आम्हाला वाटलं होतं. पण, त्यांचं नाव नाहीये.
मोदीः हो, खरे आहे. मी त्यांचे नांव केंद्रीय मंत्रीमंडळात घेतलेले नाही.
फडणवीसः आमच्या अपेक्षा होत्या मुंडेसाहेब केंद्रात येतील म्हणून. ते चांगल्या मार्जिनने निवडून आले आहेत.
मोदीः हो, अगदी खरं आहे. पण, मी मुंडेसाहेबांना जाणूनबुजून घेतलेले नाही. कारण त्यांच्यासारखे ज्येष्ठ नेते मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसवायचे आहेत. दोन दिवसांनी मी पार्लमेंटरी बोर्डाची बैठक बोलावतोय आणि त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून भाजपातर्फे गोपीनाथ मुंडे यांचे नाव जाहीर करतोय.
फडणवीसः हे चांगलेच आहे. पण..
मोदीः पण काय?
फडणवीसः त्यांना जर आता केंद्रात घेतले तर?
मोदीः हे पाहा देवेंद्र, मुंडेसाहेबांना आता केंद्रात घेतले तर त्यांचे महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होईल. मला ते नकोय. मला बाय हुक अँड क्रूक कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणायची आहे.
फडणवीसः आपण म्हणताय ते बरोबर आहे, पण माझं म्हणणं असे आहे.
मोदीः काय?
फडणवीसः आता आपण मुंडेसाहेबांना केंद्रात घेऊन त्यांना जे खाते द्याल, त्या खात्यामार्फत येत्या सहा महिन्यात केंद्राचा निधी महाराष्ट्राकडे वळविता येईल आणि त्याचा फायदा आपल्याला सहा महिन्यानंतर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत होईल.
मोदीः तुम्ही म्हणताय ते मला पटतंय देवेंद्रजी, आपण तसेच करू.

देवेंद्र फडणवीस यांचा हा जबरदस्त युक्तीवाद नरेंद्र मोदी यांना पटला आणि मोदी यांच्या डोक्यात देवेंद्र फडणवीस हे नावही पक्के बसले. 26 मे 2014 रोजी गोपीनाथ मुंडे केंद्रात ग्रामविकासमंत्री झाले. फडणवीस यांच्या योग्य आणि चपखल अशा युक्तीवादामुळे मुंडे केंद्रात मंत्री झाले. भाजपात फडणवीस यांच्या अभ्यासू आणि वकिली बाण्याच्या नेत्याची, नेतृत्त्वाची चुणूक पाहायला मिळाली. दुर्दैवाने 3 जून 2014 रोजी गोपीनाथरावांचा अपघाती मृत्यू झाला आणि सर्व राजकीय समीकरणे महाराष्ट्रासाठी बदलली. ऑक्टोबर 2014 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तोवर 25 सप्टेंबर 2014 रोजी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपा युती तुटली आणि अर्ध्या तासात काँग्रेस-राष्ट्रवादी हे राज्यातल्या सत्तेतले दोन पक्षही आघाडी तोडून स्वतंत्र लढण्यास सिध्द झाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षात असलेले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन पक्ष पहिल्या दोन क्रमांकावर आले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. भाजपाचे 123 आमदार निवडून येऊन 288 विधानसभा सदस्यांमध्ये पहिल्या व सर्वात मोठ्या पक्षाचा मानकरी ठरला. चतुर राजकारणी शरद पवार यांनी न मागता भाजपाला बाहेरून सरकार बनवण्यासाठी समर्थन देत असल्याचे घोषित केले. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांची एकमताने निवड झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला हिरवा कंदिल दाखविला आणि वानखेडे स्टेडियमवर ऐतिहासिक समारोहात देवेंद्र फडणवीस यांनी 31 ऑक्टोबर 2014 रोजी महाराष्ट्राच्या बिगर काँग्रेसी अशा भाजपा सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

288 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी किमान 145 सदस्य असणे आवश्यक होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपले अल्पमतातले सरकार बहुमतात आणण्यासाठी चंद्रकांत पाटील आणि धर्मेंद्र प्रधान या दोन नेत्यांना मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चेसाठी धाडले. भाजपाच्या 123 सदस्यांना शिवसेनेच्या 63 आमदारांची मजबूत साथ मिळाली आणि 5 डिसेंबर 2014 रोजी भाजपा-शिवसेना युतीचे मजबूत सरकार वाटचाल करू लागले. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगला समन्वय साधला गेला होता. हां हां म्हणता देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने चार वर्षं पूर्ण केली. या चार वर्षांच्या काळात एक मे 1960 रोजी स्थापन झालेल्या या महाराष्ट्रात कधी घडल्या नव्हत्या अशा सर्व महत्त्वाच्या घटना घडल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकांची भूमीपूजने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांनी घडवून आणली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी डांगोरा पिटणारे पण प्रत्यक्षात आणू न शकणारे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना लागू केली. आजवर सुमारे 60 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमाही झाली जे आजवर कुणी केले नाही ते फडणवीस सरकारने केले.

मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी योजना फडणवीस यांनी पुढे नेण्याचे काम केले. मेक इन इंडियाप्रमाणे मेक इन महाराष्ट्र, प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत 19 लाख ते 20 लाख लोकांना परवडणारी घरे बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण मंडळाची स्थापना, मेट्रोचे संपूर्ण महाराष्ट्रात जाळे, कोस्टल रोड, मुंबई-नागपुर समृध्दी महामार्ग अशा एक ना अनेक प्रकल्पांची रांग फडणवीस यांनी उभी केली. महाराष्ट्राने आजवर यशवंतराव चव्हाण यांच्यापासून देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत मुख्यमंत्र्यांची कारकीर्द पाहिली. चव्हाण एक मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. 1962 साली ते नवी दिल्लीला केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेल्यानंतर मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाले. त्यांची कारकीर्द अल्पकालीन ठरली. त्यानंतर वसंतराव फुलसिंग नाईक 5 डिसेंबर 1963 रोजी मुख्यमंत्री झाले. 20 फेब्रुवारी 1975 पर्यंत त्यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द म्हणजेच 11 वर्ष 2 महिने 15 दिवस होती. त्यानंतर अनेक मुख्यमंत्री झाले. पण विलासराव देशमुख यांनी वसंतराव नाईक यांच्या खालोखाल जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा (4 वर्षे 1 महिना 3 दिवस) असा विक्रम केला. पण देवेंद्र फडणवीस या बिगर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांनी विलासरावांना मागे टाकून 4 वर्ष 1 महिना 4 दिवस असा कालावधी पूर्ण करताना वसंतराव नाईक यांच्या खालोखाल जास्त काळ मुख्यमंत्रीपदावर राहण्याचा विक्रम प्रस्थापित केला. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा संपूर्ण वरदहस्त असल्याने फडणवीस आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करतील आणि महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचा विक्रम सर्वाधिक कालावधी पूर्ण करणारे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री म्हणून कायम राहील, हे निःसंशय!

“योगेश वसंत त्रिवेदी

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content