Details
अमेरिकन ‘अपाचे’ होणार पुढील महिन्यात भारतीय वायुसेनेत दाखल!
28-Aug-2019
”
विनय गजानन खरे
kharevinay196509@gmail.com
भारतीय हवाई दलाची मारक क्षमता वाढविण्यासाठी अलिकडेच देशात आलेले ‘अपाचे’ हेलिकॉप्टर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते पठाणकोट हवाई तळावर ३ सप्टेंबर २०१९ रोजी अधिकृतरित्या वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होईल. हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्यासह भारताच्या तिनही दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहतील.
यांच्या सहभागाने भारतीय सशस्त्र दलाला अधिक मजबुती मिळणार आहे. २००८ सालापासून भारत-अमेरिका या दोन्ही देशातील संरक्षण व्यापार शून्यावरून १५ बिलियन डॉलरपर्यंत वाढला आहे. एएच-६४ ई ही भारतीय लष्कर आधुनिकीकरणाचा मोठा सौदा मानला जातो. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या काळात हा सौदा केवळ अपाचे हेलिकॉप्टर पुरता मर्यादित न राहता इतरही सामग्रीशी संबंधित आहे. यात नियंत्रण रडार, क्षेपणास्त्रे, स्टिंगर ब्लॉक आय-९२ एच क्षेपणास्त्रे, नाईट व्हिजन सेन्सर, नेव्हीगेशन सिस्टीम यांचा समावेश आहे. या अत्याधुनिक उपकरणांनी भारत क्षेत्रीय धोक्यांना अधिक सक्षमपणे तोंड देऊ शकतो, असं संरक्षण तज्ज्ञांना वाटतं.
सद्यस्थितीत हे हेलिकॉप्टर वापरणारा भारत १४वा देश आहे. याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ‘चिनुक’ हेलिकॉप्टरचा पहिला ताफा वायूसेनेत सामील करून घेण्यात आला. गुजरातच्या मुंद्रा बंदरात ती उतरवण्यात आली. बोइंगने उत्पादित केलेली ही ॲटॅक हेलिकॉप्टर जगातील सर्वात आधुनिक आणि घातक समजली जातात. भारताने याबाबतचा सौदा २०१५ मध्ये अमेरिकेसोबत केला होता. भारतीय हवाई दलात मागील तीन दशकांपासून सेवा देणाऱ्या जुन्या एमआय ३५ या हेलिकॉप्टरची जागा अपाचे घेईल. या टु सीटर हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर मिसाईल बसवली असून यातील नाईट सेन्सर रात्रीच्या कारवाया धडाक्याने करू शकेल.
‘अपाचे’चा पहिला ताफा हिंडन एअरबेसवर तीन आठवड्यापूर्वी अमेरिकन एंटोनोव या कार्गो विमानातून उतरवला गेला. २२पैकी आधी चार आणि नंतर चार अशी आठ ‘अपाचे’ हेलीकॉप्टर आतापर्यंत आली आहेत. यात अधिकची सहा हेलीकॉप्टर घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने नंतर घेतला.
घुसखोरी रोखणार –
लष्करी सामर्थ्याला बळ देण्यासाठी स्वातंत्र्य दिनी भारतीय वायुसेनेच्या लखनौतील मेमोरा तळावर एकीकृत वायु कमांड आणि नियंत्रण प्रणाली (आय एस सी सी ए एस) ची सुरूवात करण्यात आली. याद्वारे मध्य वायु कमांड क्षेत्रात ड्रोन, मायक्रो लाईट हेलिकॉप्टर, एखादा मोठा फुगा यांनी प्रवेश केला तर त्याची चित्रं मुख्यालयात जातील आणि त्याद्वारे होणारी घुसखोरी थांबविण्यास कृती करता येईल.
या सुधारित प्रणालीमुळे हवाई सीमा सुरक्षेसाठी नवी ताकद मिळेल. तसेच देशाच्या मध्य भागात आणि सात राज्याच्या सीमेत अतिक्रमण बचाव करता येईल. या प्रणालीने अधिकारी जवानांना त्वरेने निर्णय घेण्यात मदत मिळेल, तात्काळ कारवाई करणे सोपे जाईल. हवाई धोक्याचे आकलन ही पटकन होईल. बोइंगकडून २०२० पर्यंत २२ अपाचे देण्याबरोबरच त्यांच्या कार्यान्वयनाची जबाबदारीदेखील हवाई दलाकडे सोपवली जाईल.
खरे पाहता २०१८ सालीच ही वायूदलाकडे द्यायला हवी होती. हा तीन बिलियन डॉलरमध्ये १५ अवजड हेलिकॉप्टर देण्याचा सौदा युपीएच्या कार्यकाळात झाला होता. पण, स्वाक्षऱ्या होणे बाकी असल्याने शक्य झाले नाही. २५ मार्च रोजी चंदीगड येथे एका कार्यक्रमात त्याचा ताबा देण्यात आला. यांचा उपयोग मालवाहू म्हणून ही होणार असून लडाखच्या डोंगरी भागासह दोन्ही दलांच्या गरजेनुसार वापर होईल.
आता लष्करी सामर्थ्यात वाढ काही अंशी झाली हे मान्य ! पण, इतर प्रकार थांबवून सुधारणादेखील झाल्या पाहिजेत, भरती अधिकच होऊन ते तणाव रहित राहतील याकडेही लक्ष पुरवावे लागेल. सामग्री व्यवस्थापनातील किचकट प्रक्रिया सोपी झाली जवानापर्यंत पुरेसे फायदे पोहचले तर …पण हे करणार कोण, अशा वेळी समित्या सुधारणा कागदावर राहतात हा अनुभव येतो.
पुढील बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
सावरकर स्मारकाच्या धनुर्धारींचे यश
https://www.kiranhegdelive.com//Encyc/2019/8/29/The-success-of-the-archers-of-the-Savarkar-Smarak-.html
”
विनय गजानन खरे
kharevinay196509@gmail.com
भारतीय हवाई दलाची मारक क्षमता वाढविण्यासाठी अलिकडेच देशात आलेले ‘अपाचे’ हेलिकॉप्टर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते पठाणकोट हवाई तळावर ३ सप्टेंबर २०१९ रोजी अधिकृतरित्या वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होईल. हवाई दल प्रमुख बी. एस. धनोआ यांच्यासह भारताच्या तिनही दलातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहतील.
“यांच्या सहभागाने भारतीय सशस्त्र दलाला अधिक मजबुती मिळणार आहे. २००८ सालापासून भारत-अमेरिका या दोन्ही देशातील संरक्षण व्यापार शून्यावरून १५ बिलियन डॉलरपर्यंत वाढला आहे. एएच-६४ ई ही भारतीय लष्कर आधुनिकीकरणाचा मोठा सौदा मानला जातो. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या काळात हा सौदा केवळ अपाचे हेलिकॉप्टर पुरता मर्यादित न राहता इतरही सामग्रीशी संबंधित आहे. यात नियंत्रण रडार, क्षेपणास्त्रे, स्टिंगर ब्लॉक आय-९२ एच क्षेपणास्त्रे, नाईट व्हिजन सेन्सर, नेव्हीगेशन सिस्टीम यांचा समावेश आहे. या अत्याधुनिक उपकरणांनी भारत क्षेत्रीय धोक्यांना अधिक सक्षमपणे तोंड देऊ शकतो, असं संरक्षण तज्ज्ञांना वाटतं.”
सद्यस्थितीत हे हेलिकॉप्टर वापरणारा भारत १४वा देश आहे. याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ‘चिनुक’ हेलिकॉप्टरचा पहिला ताफा वायूसेनेत सामील करून घेण्यात आला. गुजरातच्या मुंद्रा बंदरात ती उतरवण्यात आली. बोइंगने उत्पादित केलेली ही ॲटॅक हेलिकॉप्टर जगातील सर्वात आधुनिक आणि घातक समजली जातात. भारताने याबाबतचा सौदा २०१५ मध्ये अमेरिकेसोबत केला होता. भारतीय हवाई दलात मागील तीन दशकांपासून सेवा देणाऱ्या जुन्या एमआय ३५ या हेलिकॉप्टरची जागा अपाचे घेईल. या टु सीटर हेलिकॉप्टरमध्ये हेलिफायर आणि स्ट्रिंगर मिसाईल बसवली असून यातील नाईट सेन्सर रात्रीच्या कारवाया धडाक्याने करू शकेल.
‘अपाचे’चा पहिला ताफा हिंडन एअरबेसवर तीन आठवड्यापूर्वी अमेरिकन एंटोनोव या कार्गो विमानातून उतरवला गेला. २२पैकी आधी चार आणि नंतर चार अशी आठ ‘अपाचे’ हेलीकॉप्टर आतापर्यंत आली आहेत. यात अधिकची सहा हेलीकॉप्टर घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने नंतर घेतला.
घुसखोरी रोखणार –
“लष्करी सामर्थ्याला बळ देण्यासाठी स्वातंत्र्य दिनी भारतीय वायुसेनेच्या लखनौतील मेमोरा तळावर एकीकृत वायु कमांड आणि नियंत्रण प्रणाली (आय एस सी सी ए एस) ची सुरूवात करण्यात आली. याद्वारे मध्य वायु कमांड क्षेत्रात ड्रोन, मायक्रो लाईट हेलिकॉप्टर, एखादा मोठा फुगा यांनी प्रवेश केला तर त्याची चित्रं मुख्यालयात जातील आणि त्याद्वारे होणारी घुसखोरी थांबविण्यास कृती करता येईल.”
“या सुधारित प्रणालीमुळे हवाई सीमा सुरक्षेसाठी नवी ताकद मिळेल. तसेच देशाच्या मध्य भागात आणि सात राज्याच्या सीमेत अतिक्रमण बचाव करता येईल. या प्रणालीने अधिकारी जवानांना त्वरेने निर्णय घेण्यात मदत मिळेल, तात्काळ कारवाई करणे सोपे जाईल. हवाई धोक्याचे आकलन ही पटकन होईल. बोइंगकडून २०२० पर्यंत २२ अपाचे देण्याबरोबरच त्यांच्या कार्यान्वयनाची जबाबदारीदेखील हवाई दलाकडे सोपवली जाईल.”
“खरे पाहता २०१८ सालीच ही वायूदलाकडे द्यायला हवी होती. हा तीन बिलियन डॉलरमध्ये १५ अवजड हेलिकॉप्टर देण्याचा सौदा युपीएच्या कार्यकाळात झाला होता. पण, स्वाक्षऱ्या होणे बाकी असल्याने शक्य झाले नाही. २५ मार्च रोजी चंदीगड येथे एका कार्यक्रमात त्याचा ताबा देण्यात आला. यांचा उपयोग मालवाहू म्हणून ही होणार असून लडाखच्या डोंगरी भागासह दोन्ही दलांच्या गरजेनुसार वापर होईल.”
“आता लष्करी सामर्थ्यात वाढ काही अंशी झाली हे मान्य ! पण, इतर प्रकार थांबवून सुधारणादेखील झाल्या पाहिजेत, भरती अधिकच होऊन ते तणाव रहित राहतील याकडेही लक्ष पुरवावे लागेल. सामग्री व्यवस्थापनातील किचकट प्रक्रिया सोपी झाली जवानापर्यंत पुरेसे फायदे पोहचले तर …पण हे करणार कोण, अशा वेळी समित्या सुधारणा कागदावर राहतात हा अनुभव येतो.”