Details
अमूर्त चित्रकाराच्या कलेचा संवेदनशील कलावंतांकडून गौरव!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
‘गायतोंडे’ ग्रंथाचे गुलजार यांच्या हस्ते मुंबईत प्रकाशन
भारतात अमूर्त चित्रकला क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ कलाकार म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री वासुदेव गायतोंडे यांच्या कलाकार्याचा गौरव करणारा ग्रंथ ‘गायतोंडे’च्या हिंदी आवृत्तीचे प्रकाशन येत्या 6 एप्रिलला दुपारी चार वाजता मुंबईतल्या राष्ट्रीय आधुनिक कला अकादमीच्या सभागृहात ज्येष्ठ कवी, गीतकार, दिग्दर्शक गुलजार यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचारणे यांनी दिली.
‘चिन्ह’ने संपादित केलेल्या या मराठी ग्रंथाची हिंदी आवृत्ती ललित कला अकादमीने काढली आहे. मराठी भाषेतील या ग्रंथाला कलाजगतातील जाणकार आणि सर्वसामान्य रसिकांनीही उत्तम प्रतिसाद दिला.त्यामुळे हा ग्रंथ देशभरातील रसिकांपर्यत पोहोचवण्यासाठी अकादमीने त्याचा हिंदी अनुवाद केला आहे.
एनजीएमएमध्ये होणाऱ्या ह्या प्रकाशन समारंभाला सुप्रसिद्ध हिंदी अनुवादक प्रकाश भातंब्रेकर आणि प्रतिष्ठा सिंह, ललित कला अकादमीचे अध्यक्ष उत्तम पाचारणे आणि ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक उपस्थित राहणार आहेत.
एक मनस्वी, गूढ चित्रकाराच्या कलेमागच्या प्रेरणा आणि विचाराचे रहस्य कवी गुलजार यांच्या हस्ते उलगडणे रसिकांसाठी मेजवानी राहणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी चित्रपट कथा आणि पटकथा लेखिका मनीषा कोरडे करणार आहेत.
चित्रकार वासुदेव गायतोंडे जागतिक दर्जाचे अमूर्त कलाकार होते. त्यांची चित्रशैली, आयुष्य आणि कलेविषयीची त्यांची गूढ दृष्टी रसिकांपर्यत पोहोचवण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ हिंदीत आणला आहे. ललित कलांना प्रोत्साहन देणे, उदयोन्मुख कलाकारांना त्यांच्या कला प्रदर्शित करण्याची संधी देणे तसेच ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करणे ही ललित कला अकादमीची जबाबदारी आहे, अशी माहिती पाचारणे यांनी दिली. ह्याच विचारातून हा ग्रंथ प्रकाशित करताना आपल्याला विशेष आनंद होत आहे, असं पाचारणे यांनी सांगितलं.
ललित कला अकादमीचे साठावे राष्ट्रीय प्रदर्शन सध्या मुंबईत सुरू आहे. ललित कलांना सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचवणे आणि कलाकारांना राष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दरवर्षी हे कलाप्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनात देशभरातील कलाकारांच्या कलाकृती लावण्यात आल्या आहेत. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलेल्या 15 कलाकारांच्या कलाकृतीदेखील या प्रदर्शनात आहेत. 16 एप्रिलपर्यत हे प्रदर्शन रसिकांना बघता येणार आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो