HomeArchive`ओकिनावा’ इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या...

`ओकिनावा’ इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या तयारीत

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
“ओकिनावा, या ‘मेक इन इंडिया’वर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने घोषणा केली आहे की, त्यांची पहिली इलेक्ट्रिक बाईक ‘ओकी १००’ ही १०० टक्के स्थानिक पातळीवर निर्माण करण्यात आलेले उत्पादन असणार आहे. ब्रॅण्ड भारतीय इलेक्ट्रिक वाहन विभागामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ दृष्टिकोनाला चालना देत आला आहे. याच दृष्टिकोनासह ओकिनावाने सांगितले आहे की, बॅटरी सेल्स वगळता आगामी ओकि १००चे सर्व घटक भारतामध्ये उत्पादित करण्यात येणार आहेत.”
 
“बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक बाईक ‘ओकि १००’ प्रतितास १०० किमी.ची अव्वल गती प्राप्त करेल आणि या बाईकमध्ये लिथियम आयन बॅटरी असणार आहे. ऑटो एक्स्पो २०१८मध्ये बाईकच्या प्रोटोटाइपचे अनावरण करण्यात आले होते आणि बाईकमधील सर्वोत्तम तंत्रज्ञान, वैशिष्ट्ये व आकर्षकतेसाठी उपस्थितांनी बाईकचे भरभरून कौतुक केले होते. ही इलेक्ट्रिक बाईक आर्थिक वर्ष २०२०-२१च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये सादर करण्याइत येणार आहे.”
 

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content