Saturday, July 27, 2024
HomeArchiveओकिनावाद्वारे १०००हून अधिक...

ओकिनावाद्वारे १०००हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटर्सची विक्री!

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
ओकिनावा या ‘मेक इन इंडिया’वर फोकस असलेल्या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने आर्थिक व्यवहारांसदर्भात सरकारने शिथिलता आणल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या ब्रँड कार्यसंचालनापासून महिनाभरात १०००हून अधिक स्कूटर्सची विक्री केल्याची घोषणा केली आहे. या ब्रँडने भारतभरातील ३५० हून अधिक डिलर्सपैकी ६० ते ७० टक्‍के कार्यरत टचपॉईंट्सच्या माध्यमातून हा विक्री आकडा संपादित केला. कंपनीने कोविड-१९ प्रतिबंधासाठी २५ टक्‍के कर्मचारीवर्ग आणि सुरक्षितताविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करत ११ मे २०२० रोजी अंशत: कार्यसंचालनांना सुरूवात केली. ओकिनावाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरच्या १ महिन्याच्या कार्यसंचालनामध्ये १२००हून अधिक वाहने पाठवली आहेत.
 
“हा ब्रँड त्यांच्या भागधारकांच्या सुरक्षिततेसंदर्भात सर्व आवश्‍यक खबरदारीचे उपाय घेत आला आहे. उत्पादन युनिटमधील असेम्बलीमधून पाठवण्यापूर्वी सर्व उत्पादने सॅनिटाईझ केली जातात आणि डिलरशिप्समध्ये डिलर भागीदार उत्पादने मिळाल्यानंतर सॅनिटाईझ करतात. ओकिनावा आर्थिक वर्ष २०२०मधील भारतातील हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीमध्ये अव्वल स्थानी आहे आणि भारतामध्ये १०,०००चा टप्पा पार करणारी एकमेव ईव्‍ही कंपनी आहे.”
 

Continue reading

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल...

वरूणराजापुढे “धर्मवीर – २” नतमस्तक!

बहुचर्चित "धर्मवीर - २" या चित्रपटाचं प्रदर्शन आता लांबणीवर पडले आहे. ९ ऑगस्टला "धर्मवीर - २" चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी, त्यामुळे ओढवलेल्या पूरपरिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.   "धर्मवीर -...

आता आयकर भरा व्‍हॉट्सअॅपच्‍या माध्‍यमातून!

क्‍लीअरटॅक्‍स या भारतातील आघाडीच्‍या ऑनलाईन टॅक्‍स-फाइलिंग प्‍लॅटफॉर्मने त्‍यांच्‍या उल्‍लेखनीय व्‍हॉट्सअॅप आधारित इन्‍कम टॅक्‍स रिटर्न (आयटीआर) फाइलिंग सोल्‍यूशनच्‍या लाँचची नुकतीच घोषणा केली. या उल्‍लेखनीय सेवेचा भारतातील २ कोटींहून अधिक कमी-उत्‍पन्‍न ब्‍ल्‍यू-कॉलर व्‍यक्‍तींसाठी आयकर भरण्‍याची सुविधा सोपी करण्‍याचा मानस आहे, जे...
error: Content is protected !!