Homeचिट चॅटयुवा कुस्तीपटू सुप्रिया...

युवा कुस्तीपटू सुप्रिया गुप्ता अभ्यासातदेखील चमकली!

भाईंदर येथील श्री गणेश आखाड्याची युवा कुस्तीपटू सुप्रिया गुप्ताने नुकत्याच झालेल्या दहावी शांलात (एस.एस.सी.) परिक्षेत चक्क ९१ टक्के गुण मिळवून आपण खेळाबरोबरच अभ्यासातदेखील हुशार असल्याचे दाखवून दिले.

सुप्रिया भाईंदर सेकंडरी स्कूलची विद्यार्थिनी आहे. या व्यायामशाळेत आपली मोठी बहिण डॉलीसोबत सुप्रिया कुस्तीचे गेली पाच वर्षे धडे गिरवत आहे. कुस्तीत लहान वयात चमक दाखवणाऱ्या सुप्रियाने आता एस.एस.सी.त एवढे गुण मिळवून व्यायामशाळेत नवा अध्याय लिहला आहे. वक्तृत्व स्पर्धेतदेखील आतापर्यंत बरीच बक्षिसे मिळवणाऱ्या सुप्रियाने सातवीपासुन अभ्यास सिरियसली घेण्यास सुरुवात केली. मोठी बहिण डॉलीने अभ्यासाचे महत्त्व‌‌ पटवल्यावर सुप्रियाने मग अभ्यासाची चांगली लय पकडली. डॉलीनेच दहावीच्या अभ्यासाचे वेळापत्रक तिला आखून दिले होते. त्याप्रमाणेच सुप्रियाने अभ्यासाची सांगड घालून घवघवीत यश संपादन केले. अभ्यासावर जोर देत असताना तिने आपल्या कुस्तीमधील सरावात कधी खंड पडू दिला नाही. सकाळ, संध्याकाळच्या दोन सत्रात तिचा नियमित सराव सुरुच होता.

तिच्या घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच. आई, वडिल, तीन बहिणी, एक भाऊ असे मध्यमवर्गीय गुप्ता कुंटूंब. वडिल रिक्षा चालवून, स्लायडिंग विंडोज बसवण्याचा व्यवसाय करुन कुटुंबांची गुजराण करतात. त्यामुळे प्रतिकुल परिस्थितीवर मात करुन सुप्रियाने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती कुंटुबातील सर्व सदस्य, शाळेतील सर्व शिक्षकवर्ग आणि श्री गणेश आखाड्याचे सर्वेसर्वा असलेल्या वस्ताद वसंतराव पाटील, एन.आय.एस. प्रशिक्षक वैभव माने यांना देते. भविष्यात सीए होण्याचे आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे तिचे स्वप्न आहे. त्यासाठी अथक मेहनत आणि खडतर सराव करण्याची सुप्रियाची तयारी आहे. वस्ताद वसंतराव पाटील म्हणाले की, एखादा‌ युवा खेळाडू खेळ आणि अभ्यास याची कशी सांगड घालू शकतो याचे सुप्रिया उत्तम उदाहरण आहे. याच व्यायामशाळेतील पवन तावरे, जय पवार, लकी अडबल्ले, कविता राजभर, पृथ्वीराज बोबडे यांनी १०वीच्या शालांत परीक्षेत आणि आदर्श शिंदे, बाबासो नरळे, कोमल पटेल, डॉली गुप्ता, हार्दिक मोरे या कुस्तीपटूंनी १२ वीच्या परिक्षेत चांगले यश संपादन केले आहे.

Continue reading

हृतिक-कियाराचे आजवरचे सर्वात देखणे प्रेमगीत ‘आवन जावन’!

यशराज फिल्म्सने ‘वॉर 2’ या बहुचर्चित चित्रपटाचं पहिलं गाणं ‘आवन जावन’ नुकतंच प्रदर्शित केलं असून, हृतिक रोशन आणि कियारा अडवाणी यांची स्क्रीनवरची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. गाण्याच्या हळव्या आणि मधुर चालीसोबत त्यातील इटलीच्या टस्कनीतील निसर्गरम्य ग्रामीण भागापासून...

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...
Skip to content