Homeमाय व्हॉईसइंडिया आघाडीची कालची...

इंडिया आघाडीची कालची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग!

कालची इंडिया आघाडीची सभा म्हणजे केवळ एक फॅमिली गॅदरिंग होती. भानुमतीचा गुंदा अशी एक गोष्ट आहे. तशाप्रकारे धरून-बांधून आणलेले लोक या सभेमध्ये दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. नैराश्याचे भाव स्पष्ट दिसत होते. एक विश्वास गमावलेला विरोधी पक्ष समोर दिसत होता. त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. कोणताही विकासाचा अजेंडा नाही. पंतप्रधानपदाचा उमेदवारदेखील ते अजूनपर्यंत जाहीर करू शकले नाहीत. केवळ एकमेकांकडे बोट दाखवतात. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे, त्यांचा द्वेष करणे हा एकमेव अजेंडा असल्याचे प्रत्येकाच्या भाषणातून दिसत होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेची खिल्ली उडवली.

ज्यांना देशाच्या जनतेने आधीच नाकारले आहे. सत्तेतून हद्दपार केलेले आहे अशा इंडिया आघाडीच्या तडीपार नेत्यांची ती सभा होती. २०१४पूर्वी याच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकीदार म्हणून हिणवले होते. आज देशाच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. या सभेमधून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये एक नवीन गोष्ट घडली. ती म्हणजे वंदनीय बाळासाहेब भाषणाची सुरुवात करताना ज्याप्रकारे ‘माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो आणि मातांनो’ या शब्दांनी भाषणाची सुरुवात करायचे. ते शब्ददेखील उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना गाळले. यावरून त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना आणि धोरणांना कायमची तिलांजली दिल्याचे दिसून आले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्हाला त्यांना सोडण्याचा विचार करावा लागला. स्वा. सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या स्टालिनसारख्या लोकांसोबत एकाच मंचावर बसावे लागले, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची माफी मागायला हवी, असेही ते म्हणाले.

फॅमिली गॅदरिंग

जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही, असे फारुक अब्दुल्ला म्हणाले. उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसले. कालच्या सभेमध्ये बोलायला उद्धव ठाकरे यांना फक्त पाच मिनिटे देण्यात आली. यातच आता त्यांची पत काय हे दिसून येते. आमदार, खासदार सारे सोडून गेल्यानंतर अशीच गत होणार, असेही शिंदे म्हणाले.

आपल्या भाषणामध्ये विरोधक आम्हाला डीलर म्हणाले. मी म्हणतो हो, आम्ही खरंच डिलर आहोत. कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी, ज्येष्ठ, तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही डील केले. काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे झाले. मोदींच्या काळात एकही घोटाळा बाहेर आला नाही. पहिल्या कॅबिनेटपासून ते शेवटच्या कॅबिनेटपर्यंत 500 निर्णय घेतले. एक पॉझिटीव्हीटी आणण्याचं काम आम्ही केलं आहे. लोकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत नक्की होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं. केंद्राने आम्हाला पूर्ण पाठबळ दिलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेनेदेखील आम्हाला भरभरून पाठिंबा दिला, प्रोत्साहन दिले, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Continue reading

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...

भारतातल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत!

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून भारतातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना  लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे.  देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे...

विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्पर्धेत ‘मुक्ता’ सर्वप्रथम!

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक...
Skip to content