Homeबॅक पेजस्पोर्टिंग युनियन, युरोपेम...

स्पोर्टिंग युनियन, युरोपेम यांची विजयी सुरुवात

भावना सानप (९८) हिच्या दमदार खेळीच्या बळावर यजमान स्पोर्टिंग युनियनने चौथ्या अजित घोष ट्रॉफी महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये माटुंगा जिमखान्याचा १११ धावांनी दणदणीत पराभव करुन विजयी सुरुवात केली. यजमानांनी २० षटकांत ५ बाद १८९ धावा केल्या. आज “अ” गटातील दुसऱ्या लढतीत युरोपेमने ओरिएंटल सी. सी.चा १६ धावांनी पराभव केला. सलामीच्या रिया पवारने ५८ चेंडूंमध्ये ८१ धावा फटकावल्याने युरोपेमला ४ बाद १६८ धावा करता आल्या. उत्तरादाखल ओरिएंटलने ६ बाद १५२ धावा केल्या.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित या स्पर्धेला कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि युरोपेम यांचे सहाय्य मिळाले आहे. भावना आणि रिया यांना त्यांच्या उत्तम कामगिरीबद्दल सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भावनाचे शतक जरी हुकले असले तरी तिने ६५ चेंडूत ९८ धावा फटकाविताना १६ चौकार आणि १ षटकार अशी आतषबाजी केली. स्पोर्टिंग युनियनच्या अंकिता पवार (२९) हिची भावना बरोबरची तिसऱ्या विकेटसाठी केलेली ९८ धावांची भागी महत्त्वाची ठरली. त्याआधी स्पोर्टिंग युनियनची २ बाद ३ धावा अशी खराब स्थिती होती. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू संगीता डबीर, सुनिता कनोजिया-सिंग यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. 

संक्षिप्त धावफलक

स्पोर्टिंग युनियन- २० षटकात ५ बाद १८९ (भावना सानप ९८), अंकिता पवार (२९), दिव्या चलवाड (२०/२), वि. वि. माटुंगा जिमखाना १४.२ षटकात सर्व बाद ७८ (अनिषा कांबळे ३७, त्वचा शेट्टी ९/२, रेणिता गोरया १३/२),  सामनावीर- भावना सानप

युरोपेम- २० षटकात ४ बाद १६८ (रिया पवार ८१) वि. वि. ओरिएंटल सी. सी. २० षटकात ६ बाद १५२ (निधी कोल्हे २५, सानिया जोशी ३४, सिद्धी कामटे २७, आर्या लोखंडे २९/४), सामनावीर- रिया पवार

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content