Homeमाय व्हॉईससंजय राठोडना लावलेला...

संजय राठोडना लावलेला कायदा आदित्य ठाकरेंना का नाही?

एका युवतीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात आपल्या मंत्रिमंडळातले सहकारी संजय राठोड यांना मंत्रिमंडळातून काढून टाकणारे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तोच न्याय आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत का लावला नाही, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज केला. दिशा सालीयन हिच्या हत्त्येत आदित्य ठाकरे यांचा हात आहे, असा आरोप आहे. मग राठोड यांना लावलेला नियम, त्यांना लावलेला कायदा आदित्य ठाकरेंच्या बाबतीत का लावला गेला नाही, असे ते म्हणाले.

समान नागरी कायद्याबाबत उद्धव ठाकरे यांनी अजूनही ठोस भूमिका घेतलेली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी समान नागरी कायद्याचा नेहमी पुरस्कार केला होता. उद्धव ठाकरेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी समान नागरी कायद्याला बिनशर्त पाठिंबा जाहीर करावा, असे ते म्हणाले.

आदित्य

शिवसेना भवन हे हिंदुत्वाचे केंद्र मानले जाते. काल तिथे मुस्लिम बोर्डाचे मौलाना उद्धव ठाकरेंना भेटायला गेले. मग आता बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचारांवर चालणारी उद्धव ठाकरे यांची सेना तेथे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करणार का नाही? तसे जमत नसेल तर त्यांनी सेनाभवनावर लावलेला बाळासाहेबांचा फोटो काढून टाकावा आणि त्याठिकाणी भोंगा लावावा. मग पहाटे जे होते ते सुरू करावे असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.

काल आदित्य ठाकरे यांच्या गाडीला एका दुचाकीने धडक दिली. ही घटना घडली नसून घडवली गेली आहे, असा माझा आरोप आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी संजय राजाराम राऊत यांनी जसा प्रयत्न केला. तशाच प्रकारचा हा प्रयत्न असू शकतो. त्यामुळे पोलिसांनी याची चौकशी करून हे षडयंत्र तर नाही ना.. याची खात्री करून घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. राहुल गांधी मणिपूरमध्ये संवाद साधायला गेले आहेत, याबद्दल गुणगान गाणाऱ्या राऊत यांनी राहुल गांधींच्या मणिपूर दौऱ्याबाबत सांगण्याऐवजी गोरेगावच्या पत्रा चाळीत जाऊन दाखवावे, असा चिमटाही राणे यांनी काढला.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content