सणासुदीच्या मोसमाच्या निमित्ताने नवी मुंबईत आरोग्यविषयक सर्वात मोठी तसेच व्यापक मोहीम सुरू करताना कळंबोली येथील व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे येत्या रविवारी, १४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत विविध स्वरूपाच्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. व्हाईट लोटस इंटरनॅशनल हॉस्पिटल, रोडपाली रोड, कळंबोली, नवी मुंबई येथे हे शिबीर होईल. मधुमेह आणि लठ्ठपणा नजरेसमोर ठेवून या तपासण्या केल्या जाणार आहेत.

या शिबिरात रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक तथा ख्यातनाम क्रिटीकल केअर एक्स्पर्ट डॉ. विजय डिसिल्वा, डॉ. प्रशांत गायकवाड (एन्डोक्राइनॉलॉजी डायबेटोलॉजी), डॉ. रवी पाटील (इंटरनल मेडिसीन), डॉ. आदित्य नायक (नेफ्रोलॉजी), डॉ. सचिन नाईक (नेफ्रोलॉजी), डॉ. सुहास देशपांडे (नेत्ररोगतज्ज्ञ) यांच्या देखरेखीखाली या तपासण्या होऊन रूग्णांना मोफत वैद्यकीय सल्लाही दिला जाणार आहे. फायब्रो स्कॅन, लिपिड प्रोफाईल, एचबीएवनसी (HbA1c), क्रिएटिनीन आणि डोळ्यांची तपासणी, अशा पाच रुपयांपर्यंतच्या मूल्याच्या तपसण्या मोफत केल्या जाणार आहेत.
इच्छुकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेण्यासाठी लगेचच ८८७९३०७९३० किंवा १८००३१३८९९० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. विजय डिसिल्वा यांनी केले आहे.