Homeमाय व्हॉईसझाडांचा शिलाई मशिनशी...

झाडांचा शिलाई मशिनशी काय संबंध?

वृक्षांचे जतन आणि संवर्धन करण्याबद्दलचे विधानसभेत सादर झालेले विधेयक आणि मुंबई महापालिकेने केलेले शिलाई मशिन्सचे वितरण, यांचा काय संबंध आहे… हा प्रश्न विचारला तर तुम्ही म्हणाल की पत्रकार वाट्टेल ते लिहितात. पण, थांबा, या दोन्हींचा संबंध आहे आणि नेमका काय संबंध आहे, ते भारतीय जनता पक्षाच्या आमदार मनीषा चौधरी यांनी शुक्रवारी विधानसभेत त्यांच्या भाषणातून सांगितले.

वास्तविक, हा संबंध केवळ बादरायण संबंध या श्रेणीतला आहे. ओढून ताणून आणलेला हा संबंध आहे. महाविकास आघाडी सरकारने विधेयक आणून २००पेक्षा जास्त झाडे कोणत्याही प्रकल्पासाठी तोडायची झाली तर पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या पातळीवर निर्णय न घेता राज्य सरकारच्या पातळीवर जावं लागेल, ही ती सुधारणा होती. पण, एकनाथ शिन्दे सरकारने आता विकेंद्रीकरणाच्या कारणासाठी हे अधिकार नागरी भागांमधे स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपवले आहेत.

शिलाई

अर्थातच, भारतीय जनता पक्षाच्या बहुतांश आमदारांनी मुंबई महापालिकेच्या कथित भ्रष्टाचारावर हल्लाबोल केला. त्यामुळेच मागाठणे भागात मुंबई महापालिकेने गोरगरीब महिलांना वाटलेल्या शिलाई यंत्रांचा उल्लेख केला. जुन्या शिवसेनेतून एकनाथ शिन्दे गटाकडे आलेले आमचे आमदार प्रकाश सुर्वे यांनीही न वाटता गोडाऊनमध्ये साठवून ठेवलेली शिलाई यंत्रे कशी जप्त केली आणि पुन्हा महापालिकेकडे आणली, याचे रसभरित वर्णन चौधरी यांनी वृक्षविषयक विधेयकावरील चर्चेत केले.

तीच गोष्ट मुंबईत महापालिकेची सत्ता ताब्यात असताना सांडपाणी व्यवस्था करण्यात आलेले अपयश, कचरा घोटाळा, मुंबई महापालिकेतला कथित घोटाळा हे सारे विषय अमित साटम, अतुल भातखळकर आदी भाजपा आमदारांनी विधानसभेत मांडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवीन्द्र वायकर, सुनील प्रभू आणि आदित्य ठाकरे यांनीही त्यांची बाजू मांडली. त्यामुळेच अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत ही विधानसभा आहे, मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा नव्हे, अशी आठवण या सदस्यांना करून दिली.

Continue reading

मुख्यमंत्री फडणवीस यांनी रोहित पवारांना सुनावले!

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातामध्ये घातपात असला तर त्यात दोषी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही थराला जाऊन दंडित करू, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत घोषणा केली आणि रोहित पवार यांच्या सर्व आरोपांना सविस्तर उत्तर दिले. अजित पवार...

आदित्य ठाकरेंना नितेश राणे देणार कोल्ड कॉफी!

नारायण राणे आणि त्यांचे मंत्री असलेले चिरंजीव नितेश राणे, हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर कडवट शब्दात टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पण, विधानसभेत मंगळवारी कोकणाच्या प्रश्नांवरील चर्चेला उत्तर देताना नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेत आदरयुक्त उल्लेख...

औचित्त्याची ऐशीतैशी…

मराठी भाषेमध्ये एखाद्या गोष्टीचे औचित्त्य काय आहे, असे विचारताना औचित्त्य, या शब्दाचा अर्थ माहीत असणे अभिप्रेत असते. राज्याच्या विधानसभेत कामकाज केले जाताना औचित्त्याचे मुद्दे म्हणून काही बाबी आमदारांना उपस्थित करता येतात आणि सरकारने त्यावर उचित कार्यवाही करणेही अपेक्षित असते....
Skip to content