Homeमाय व्हॉईसतुम्ही कर्जतच्या फार्महाऊसवर...

तुम्ही कर्जतच्या फार्महाऊसवर सर्व्हे केला का?

महायुतीच्या सरकारबद्दल झालेल्या सर्व्हेवर टीका करण्याआधी संजय राजाराम राऊत यांनी आपल्या मालकांना दर तीन महिन्यांनी बेस्ट सीएम म्हणून मिळालेल्या किताबासाठी केलेला सर्व्हे कोठे केला होता हे सांगावे. हे सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊसवर बसून केले होते का, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

शिंदे सरकारच्या सर्व्हेबद्दल संजय राऊत म्हणाले की, हा सर्व्हे सरकारी बंगल्यात बसून केला होता. त्याला प्रत्त्युत्तर देताना नितेश राणे बोलत होते. अडीच वर्षे तुमच्या मालकांमुळे महाराष्ट्र देशोधडीला लागला. पिछाडीला गेला. तरीही तुमच्या मालकांना दर तीन महिन्याने बेस्ट सीएमचा पुरस्कार कसा काय मिळाला? याचा सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊसवर झाला होता की डिनो मोरयाच्या घरी, याची माहिती संजय राऊत यांनी द्यावी. दुसऱ्यांचा सर्व्हे आल्यावर तुमच्या बुडा खाली चांगली आग लागते. पण तुमचे मालक आणि त्यांचा मुलगा बॉलिवूडच्या कलाकारांना स्वतःची लाल करून घेण्यासाठी दर महिन्याला किती पैसे द्यायचे, याची माहिती मी देऊ का? त्या एजन्सीची माहिती देऊ का? म्हणजे तुम्हालाही कळेल की करोडोचा पैसा देऊन हे बॉलीवूडचे कलाकार तुमचे मालक आणि त्यांच्या मुलाची कशी लाल करायचे…, असा सवाल त्यांनी केला.

आमचे सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे. लोकांच्या मनात असलेले काम करत आहे. गतिमान महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे हे असे सर्व्हे येत आहेत. हे सर्व्हे तुम्ही जेवढे लवकर पचवाल तेव्हढे जास्त पोट साफ होईल. नाही तर हाजमोलाचा एक डबा पाठवतो. खात बसा आणि सर्व्हे वाचत बसा… असेही नितेश राणे म्हणाले.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content