Wednesday, March 12, 2025
Homeटॉप स्टोरीयेत्या बुधवार-गुरूवारी मुंबईतल्या...

येत्या बुधवार-गुरूवारी मुंबईतल्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत

२४०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी येत्या बुधवारी, ५ फेब्रुवारीला सकाळी ११ ते गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ३० तासांच्या कालावधीत मुंबईतल्या एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदादरम्यान २४०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून २४०० मिलीमीटर व्यासाची नवीन जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईतल्या काही भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

या विभागात पाणीपुरवठा बंद-

१) एस विभाग: श्रीरामपाडा, खिंडीपाडा, तुळशेतपाडा, मिलिंद नगर. नरदास नगर, शिवाजी नगर, मरोडा हिल, भांडुप (पश्चिम), गौतम नगर, फिल्टर पाडा, महात्मा फुले नगर, पासपोली गाव, तानाजीवाडी उदंचन केंद्र, मोरारजी नगर. सर्वोदय नगर, गावदेवी टेकडी. तुळशेतपाडा, टेंभीपाडा, नरदास नगर, रमाबाई नगर १ आणि २, साई हिल भांडुप जलाशय येथून होणारा पाणीपुरवठा (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एस विभाग: क्वारी मार्ग, प्रताप नगर मार्ग, जंगल मंगल मार्ग, टेंभीपाडा, गावदेवी मार्ग, दत्त मंदीर मार्ग, लेक मार्ग, सोनापूर जंक्शन ते मंगतराम पेट्रोल पंपपर्यंतचा लालबहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर, भांडुप (पश्चिम), शिंदे मैदानाजवळील परिसर, प्रताप नगर मार्ग, फुले नगर टेकडी, रामनगर उदंचन केंद्र, रावते कंपाऊंड उदंचन केंद्र, हनुमान टेकडी, अशोक टेकडी, (नवीन हनुमान नगर) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

२) एल विभाग: कुर्ला दक्षिण – काजूपाडा, सुंदरबाग, नवपाडा, हलावपूल, न्यू मील मार्ग, कपाडिया नगर, नवीन म्हाडा वसाहत, परिघखाडी, तकिया वॉर्ड, महाराष्ट्र काटा, गफुर खान इस्टेट, पाईप लाईन मार्ग, लालबहादूर शास्त्री मार्ग (पूर्व व पश्चिम), क्रांती नगर, संभाजी चौक, रामदास चौक, अण्णा सागर मार्ग (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एल विभाग: कुर्ला उत्तर – ९० फीट रोड, कुर्ला–अंधेरी मार्ग, जरीमरी, घाटकोपर–अंधेरी जोडरस्ता, साकीविहार मार्ग, मारवा उद्योग मार्ग भाग, सत्यनगर पाईपलाईन (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

मुंबई

३) जी उत्तर विभाग: धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मीन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

जी उत्तर विभाग: जस्मिन मील मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प, संत रोहिदास मार्ग, ६० फीट मार्ग, ९० फीट मार्ग, संत कक्कया मार्ग, एम. पी. नगर धोरवडा, एम. जी. मार्ग, धारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

४) के पूर्व विभाग: विजय नगर मरोळ, मिलीट्री मार्ग, वसंत ओॲसिस, गावदेवी, मरोळ गाव, चर्च रोड, हिल व्ह्यू सोसायटी, कदमवाडी, भंडारवाडा, उत्तम ढाबा (दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग: ओमनगर, कांतीनगर, राजस्थान सोसायटी, साई नगर (तांत्रिक क्षेत्र) सहार गाव, सुतारपाखाडी (पाईपलाईन क्षेत्र) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग: आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ- मुलगाव डोंगरी, एम. आय. डी. सी., मार्ग क्रमांक १ ते २३, ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग: चकाला, प्रकाश वाडी, गोविंद वाडी, मालपा डोंगरी क्रमांक १ व २, हनुमान नगर, मोटा नगर, शिवाजी नगर, शहीद भगतसिंग वसाहत (भाग), चरतसिंग वसाहत (भाग), मुकुंद रुग्णालय, तांत्रिक विभाग, लेलेवाडी, इंदिरा नगर, मापखान नगर, टाकपाडा, विमानतळ मार्ग क्षेत्र, चिमटपाडा, सागबाग, मरोळ औद्योगिक क्षेत्र, रामकृष्ण मंदीर रोड, जे. बी. नगर, बगरखा मार्ग, कांतीनगर (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

के पूर्व विभाग: कबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी. ऍन्ड. टी. वसाहत (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

५) एच पूर्व विभाग: वांद्रे टर्मिनस (दिनांक ५ व ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

एच पूर्व विभाग: ए. के. मार्ग, खेरवाडी सर्व्हिस रोड, बेहराम पाडा, खेरनगर, निर्मल नगर (वांद्रे पूर्व) (दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहील)

संबंधित परिसरातील नागरिकांनी, पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Continue reading

कुर्ल्यातल्या कबड्डी स्पर्धेत अंबिका, पंढरीनाथ संघांची बाजी

शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून मुंबईतल्या कुर्ला (पश्चिम) येथील गांधी मैदानात जय शंकर चौक क्रीडा मंडळ आणि गौरीशंकर क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी गटात अंबिका सेवा मंडळ, कुर्ला...

‘स्वामी समर्थ श्री’साठी राज्यातील दिग्गज उद्या आमनेसामने

क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या "स्वामी समर्थ श्री" राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेच्या माध्यमातून मुंबईकर शरीरसौष्ठवप्रेमींना जानदार, शानदार आणि पीळदार शरीरसौष्ठवपटूंचे ग्लॅमर पाहायला मिळणार आहे. आमदार महेश सावंत यांच्या आयोजनाखाली मुंबईच्या प्रभादेवीत दै. सामना मार्गाशेजारील...

भारतात महिलांच्या आत्महत्त्यांपैकी ३६.६% तरुणींच्या!

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये चिंता आणि नैराश्य अधिक प्रमाणात असून जागतिक स्तरावर ही समस्या अधिक व्यापक आहे, असा अहवाल नीरजा बिर्ला यांच्या नेतृत्त्वाखालील आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या एमपॉवर, या अभ्यास गटाने प्रसिद्ध केला आहे. भारतात पुरुषांपेक्षा हे प्रमाण दुप्पट असून यात...
Skip to content