Homeमुंबई स्पेशलगुरूवारी वांद्रे व...

गुरूवारी वांद्रे व खार पश्चिम भागात मिळणार कमी दाबाने पाणी

माहीम खाडी पुलाच्या विस्तारीकरणाच्या कामात येणाऱ्या ९०० मिलीमीटर रिक्लेमेशन इनलेट वळविण्याचे काम गुरुवार, दि. ४ मे २०२३ रोजी हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे वांद्रे पश्चिम आणि खार पश्चिमसह संपूर्ण ‘एच पश्चिम’ विभाग कार्यक्षेत्रात गुरुवारी, ४ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून शुक्रवारी, ५ मे रोजी पहाटे ४ वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी नमूद कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच, काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिकेने केले आहे.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content