Homeमुंबई स्पेशलउद्या लोअर परळ,...

उद्या लोअर परळ, प्रभादेवी भागात पाणीपुरवठा विस्कळीत

तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या गुरुवारी, २६ सप्टेंबरला रात्री १० वाजल्यापासून शुक्रवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सेनापती बापट मार्ग येथे तानसा (पूर्व) १,४५० मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीदरम्यान जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागांमध्‍ये पाणीपुरवठा अंशत: बंद राहणार आहे.

याचा तपशील पुढीलप्रमाणे-

१. जी दक्षिण- करी रोड, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, लोअर परळ, डिलाईल मार्ग, बी. डी. डी. चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– पहाटे ४.३० ते सकाळी ७.४५ वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

२. जी दक्षिण– एन. एम. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– दुपारी २.३० ते दुपारी ३.०० वा.) पाणीपुरवठा बंद राहील.

३. जी दक्षिण– संपूर्ण प्रभादेवी, आदर्श नगर, पी. बाळू मार्ग, हातिसकर मार्ग, मराठे मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, गणपतराव कदम मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वा.) अंशतः (३३ टक्के) पाणीपुरवठा बंद राहील.

४. जी उत्तर– सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले मार्ग, काकासाहेब गाडगीळ मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग (दैनंदिन पाणीपुरवठ्याची वेळ– दुपारी ४.०० ते सायंकाळी ७.०० वा.) अंशतः (३३ टक्के) पाणीपुरवठा बंद राहील.

संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा. पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content