Homeकल्चर +'शोले'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात...

‘शोले’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षात बघा ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’!

हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण असं आहे. “शोले” चित्रपटाचं थरारक कथानक, त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच “शोले” चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झालेला “शोले” या चित्रपटाचे यंदा  सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’, हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने ‘शोले’ला सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर येत आहे.

विश्वास मीडिया आणि एंटरटेन्मेंटचे राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो आणि काँसमीडिया एंटरटेन्मेंटचे सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अमोल गोळे यांनी छायांकन, रोहन रोहन, स्वरुप आनंद भालवणकर, वरुण लिखाते यांनी संगीत तर विनोद पाठक यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. शंकरैय्या दोराईस्वामी यांनी नृत्यदिग्दर्शन तर क्रिएटिव्ह डायरेक्टर शंकरैय्या दोराईस्वामी आणि विनोद पाठक आहेत.

‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाच्या नावातूनच “शोले” या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं. चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते  दिलीप प्रभावळकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम, बाल कलाकार श्रीरंग महाजन यांच्या प्रमुख भूमिका असून अभिनेते समीर धर्माधिकारी व आनंद इंगळे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेत आहेत.

Continue reading

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मिझोराम, मणिपूर आणि आसामच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 13 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरदरम्यान मिझोराम, मणिपूर, आसाम, पश्चिम बंगाल आणि बिहारला भेट देणार आहेत. या भेटींदरम्यान पंतप्रधान 71,850 कोटींहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन किंवा पायाभरणी करणार आहेत. आज ते मिझोराम, मणिपूर तसेच आसामचा दौरा करणार...

दादर-माटुंगा केंद्रातर्फे ऑक्टोबरमध्ये तबलावादन स्पर्धा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने शनिवार, ११ ऑक्टोबर २०२५, यादिवशी सकाळी ९.३० वाजता तबलावादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा अव्यावसायिक कलाकारांसाठी आहे. स्पर्धा १६ ते २५ वर्षे या मोठ्या वयोगटासाठी ९.३० वाजता तर १० ते १५ वर्षे,...

सी.पी. राधाकृष्णन भारताचे १५वे उपराष्ट्रपती!

महाराष्ट्राचे कालपर्यंतचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज दिल्लीत भारताचे १५वे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना अधिकारपदाची तसेच गोपनीयतेची शपथ दिली. शपथविधीनंतर राधाकृष्णन यांनी महात्मा गांधींच्या समाधीला...
Skip to content