Homeडेली पल्सविधानसभेतून विरोधकांचा सभात्याग

विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग

दोन आदिवासी महिलांच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या मृत्यूच्या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी आरोग्यमंत्र्यांच्या कथित असमाधानकारक उत्तरानंतर राजीनामा मागत बुधवारी नागपूरला विधानसभेतून सभात्याग केला.

गडचिरोली आणि बुलढाणा येथील स्त्री रुग्णालयात प्रसूतीदरम्यान झालेल्या दोन मृत्यूंबद्दल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याच्या स्त्री रुग्णालयात असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल चोरांच्या हातीच मंत्रिमहोदयांनी चौकशी सोपवल्याचा आरोप केला. बुलढाण्यातील रुग्णालयात एक शिपाई सर्व कामांचा ठेकेदार असून गेल्या अधिवेशनात मंत्रिमहोदयांनी चौकशीची घोषणा केली, पण भ्रष्टाचारात सामील असलेल्यांकडेच चौकशी सोपवली, असा आरोप केला. त्यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी या दोन्ही मृत्यूंच्या संदर्भात अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली जाईल, अशी घोषणा केली.

रजनी प्रशान्त शेडमाके (वय २३, रा. शिणी, जि. गडचिरोली) आणि उज्ज्वला नरेश बुरे (वय २७, रा. मुरखळा च, ता चामोर्शी) या दोन महिलांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला. त्यासंदर्भातील प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित करण्यात आला होता. आमदार सुनील केदार, सुभाष थोटे, अस्लम शेख आणि योगेश सागर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणात हलगर्जीपणामुळे दोन्ही महिलांचा मृत्यू ओढवला आहे, असा आरोप अनेक सदस्यांनी केला.

अध्यक्ष नार्वेकर यांनी निर्देश दिले की, चौकशी समितीचा अहवाल पुढच्या अधिवेशनात सादर करावा. त्यानंतर विरोधी सदस्यांनी जागेवर उभे राहून या प्रकरणात समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचा आरोप केला. आरोग्यमंत्री समाधानकारक उत्तर देत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

Continue reading

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांना अजून शासकीय ई-मेलच नाही?

महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार अनेक आघाड्यांवर जोरदार कार्यरत असले तरी राज्य सरकारने त्यांना तसेच या विभागाच्या प्रधान सचिवांना शासकीय ई-मेलच दिला नाही की काय, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी हिंदू मंदिर संवर्धन अभियान, मुंबई सांस्कृतिक...

जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दत्तात्रय उत्तेकर यांचे यश

केप टाऊन, दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या इक्विप्ड व क्लासिक जागतिक मास्टर्स पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या दत्तात्रय अर्जुन उत्तेकर यांनी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व मास्टर्स-४ (६६ किलो वजनी गट) मध्ये केले. त्यामध्ये त्यांनी इक्विप्ड गटात चार सुवर्णपदके मिळवली. क्लासिक स्पर्धेत त्यांनी एक...

महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आज पावसाची शक्यता

सध्या अरबी समुद्रात आणि बंगालच्या उपसागरात असे दोन कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहेत. त्यातील एक कमकुवत होत जाण्याची चिन्हे असून दुसऱ्याची तीव्रता वाढत आहे. त्यांची दिशा पाहता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता आहे. पुढील आठवडाही अवकाळी तडाखा राहू शकतो....
Skip to content