Monday, December 23, 2024
Homeकल्चर +डॉ. जयंत नारळीकरांचा...

डॉ. जयंत नारळीकरांचा ‘व्हायरस’ ऑडिओ बुकमध्ये!

प्रतिभावंत साहित्यिक, प्रज्ञावंत शास्त्रज्ञ, तळमळीचे विज्ञानप्रसारक आणि समतोल समाजचिंतक पद्मभूषण, पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांनी मराठी विज्ञान कादंबरीला समृद्ध केले आहे. त्यांची २०१५ साली साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेली ‘व्हायरस’ ही सायन्स फिक्शन कादंबरी आता ‘स्टोरीटेल मराठीच्या’ ऑडिओ बुकमध्ये उपलब्ध झाली आहे. आवाजाच्या दुनियेतील जादूगार, व्हॉइसिंग आर्टिस्ट अनिरुद्ध दडके यांच्या खणखणीत आवाजात साहित्यप्रेमी आणि विज्ञानप्रेमी श्रोत्यांचं कुतूहल चाळवणारी ही कादंबरी ऐकणं आता पर्वणी ठरणार आहे.

‘व्हायरस’ ऐकत असताना अप्रत्यक्षरित्या डोळ्यांसमोर एक परकीय जीवसृष्टी उभी राहते. या पुस्तकात समाविष्ट असलेल्या कथेत मानवी जीवनासमोर अस्तित्त्वात आलेले संकट उद्भवणार्‍या प्राणघातक विषाणूचा धोका दर्शविला गेला आहे. आलेल्या संकटावर वैज्ञानिक एकत्रितपणे कशी मात करतात? हे जाणून घ्यायचं असेल तर, नक्की ऐका, ‘व्हायरस’!

‘व्हायरस’ (इ.स. 1996) ही नारळीकरांची चौथी कादंबरी. वसाहतवादी प्रेरणांनी  संगणकप्रणालीत विषाणू सोडून परग्रहावरील सजीवांनी केलेले छुपे आक्रमण, पृथ्वीवासियांनी त्याचा लावलेला छडा आणि केलेला प्रतिबंध हे ‘व्हायरस’चे मुख्य आशयसूत्र आहे. निरनिराळया राष्ट्रांतील जीवन विस्कळीत होऊ लागते. यामागे राष्ट्रीय कारवाया आहेत, याचा छडा लावण्याचा प्रयत्न निनिराळया राष्ट्रांतील शास्त्रज्ञ, लष्करी तज्ज्ञ आणि प्रशासकीय यंत्रणा घेत असतात, हे ‘व्हायरस’चे उपसूत्र आहे.

पृथ्वीपासून सहा प्रकाशवर्षे दूर अंतरावर असलेल्या ताऱ्यापर्यंतच्या असीम स्थलावकाशात साडेसहा वर्षांच्या काळात घडलेल्या घटनांची कथा म्हणजे ही कादंबरी होय. बुध्दिमान वैज्ञानिकांचे अंतर्गत व्यवहारविश्व आणि त्यांच्याभोवतीची प्रशासनयंत्रणा यांचे चित्रण हे ‘व्हायरस’चे आणखी एक उपसूत्र आहे. अशाप्रकारे मध्यवर्ती आशयसूत्राला परिपुष्ट करणाऱ्या पूरक आणि पोषक उपसूत्रांनी ‘व्हायरस’ भरीव होते. ‘व्हायरस’ कादंबरी ऐकताना श्रोत्यांना हॉलिवूडच्या ‘इंडिपेन्डन्स डे’ चित्रपटाची आठवण करून देणारी गोष्ट ऐकत असल्याचा भास होत राहतो.

‘व्हायरस’मधील थरार आणि रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाऊनलोड करावे लागेल.

Continue reading

भारत-ऑस्ट्रेलियात व्यापारवृद्धीसाठी झाली बैठक

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सेंद्रिय उत्पादनांवरील एमआरए, भेंडी, डाळिंब, द्राक्षे, कॉटेज चीज, मॅकॅडॅमिया नट्स, मसूर आणि एवोकॅडो यासारख्या उत्पादनांशी संबंधित बाजारपेठ प्रवेशसमस्या, प्रशुल्क दर कोटाव्यवस्था, ऑस्ट्रेलियातील औषधविषयक विशेषतः जेनेरिक औषधांचे किंमत नियंत्रण, व्हिस्की आणि वाईनच्या व्यापाराला चालना देण्याकरीता दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये नुकतीच बैठक झाली. वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांच्या...

सलमान शूटआऊट प्रकरणात छोटा शकीलचे पंटर्स?

सुमारे 15 दिवसांपूर्वी सलमान खान शूटआऊटप्रकरणी व्यक्त केलेली भीती आता हळूहळू खरी ठरत असल्याचे दिसत आहे. लॉरेन्स बिष्णोई याच्या पंटर्सनी हल्ला केल्याची जबाबदारी घेतली असल्याचे जाहीर झाले असले तरी लॉरेन्सचा मुंबईत बेस नाही. मुंबईत बेस नसल्याने तो अन्य टोळ्यांचे...

येत्या बुधवारी ‘सीहॉक्स’ हेलिकॉप्टर्स, भारतीय नौदलात!

भारतीय नौदलाच्या ताफ्यात आयएनएस गरुड, कोची येथे येत्या बुधवारी, 6 मार्चला एमएच 60 आर सीहॉक (ब्लॅकहॉक हेलिकॉप्टरची सागरी आवृत्ती) हे नवीन बहुउद्देशीय हेलिकॉप्टर दाखल होणार आहे. भारताच्या संरक्षणविषयक आधुनिकीकरणाच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा क्षण ठरणार आहे. भारतीय नौदलात या हेलिकॉप्टर्सचे पथक, 'आयएनएएस 334' या नावाने कार्यरत होणार...
Skip to content