ग्लोबल सारस्वत चेंबर ऑफ एंटरप्र्युनर्सच्या वतीने लीगल आणि फायनान्स समिटचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यावेळी प्रदीर्घ काळ समाजाच्या आर्थिक साक्षरतेसाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन प्रसिद्ध आर्थिक स्तंभलेखक आणि गुंतवणूक समुपदेशक विनायक कुळकर्णी यांचा विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा सत्कार टाटा मोटर्स कंपनीचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी आणि प्रचेतस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कडले यांच्या हस्ते करण्यात आला.