Thursday, November 7, 2024
Homeकल्चर +आज आणि उद्या...

आज आणि उद्या ऑनलाईन बघा ‘ओएसिस ऑफ होप’!

परिसंस्थेचे पुनर्संचयन, या संकल्पनेतून 5 जून, 2021 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा होत आहे. याच भावनेसह पर्यावरण दिनानिमित्त, फिल्म्स डिव्हिजनने आज 5 आणि 6 जून, 2021 रोजी ‘ओएसिस ऑफ होप’ हा पर्यावरणविषयक चित्रपटांचा ऑनलाईन महोत्सव आयोजित केला आहे.

या दोन दिवसीय महोत्सवात, पर्यावरण आणि निसर्गाचे पुनरुज्जीवन तसेच  मानव आणि निसर्गाचे अविभाज्य नातेसंबंध पुनर्संचयित करण्याचे विविध मार्ग सुचवून निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्याचा सशक्त संदेश असलेल्या चित्रपटांचा समावेश असेल. फिल्म डिव्हिजनच्या संकेतस्थळावर आणि युट्युब वाहिनीवर या महोत्सवातील चित्रपटांचे प्रसारण केले जाईल.

प्रत्येक खंडातील आणि प्रत्येक महासागरातील परिसंस्थेचा ऱ्हास थांबविणे आणि परिसंस्था संवर्धनाला चालना देणे हा या संकल्पनेचा उद्देश आहे. पुर्नकल्पना, पुनर्निर्मिती, पुनर्संचयन या यंदाच्या महोत्सवाच्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत.

विशेष ‘ग्रीन पॅकेज’मधील चित्रपट म्हणजे- मणिपूरमधील छोट्या डोंगराळ भागातील निसर्गप्रेमी लोईयागांबा याच्या कथेवर प्रकाश टाकणारा चित्रपट, ‘द जंगल मॅन लोईया’ (२१ मिनिटे / फरहा खातून).

सहा वर्षांपासून, लोईया एकटाच टेकडीवर राहिला आणि त्याने घनदाट जंगल उभे केले. जवळजवळ सुरूवातीपासून पर्यावरण संवर्धनाचे काम करत त्याने स्थानिक लोकांसाठी हिरवीगार जागा तयार केली. मनुष्याच्या निसर्गाशी असलेला संबंध पुन्हा स्थापन करण्याची आणि निसर्गासोबत शांत सहअस्तित्त्वासाठी संस्कृती निर्माण करण्याची ही एक कथा आहे.

‘लिव्हिंग द नॅचरल वे’, (76 मिनिटे / संजीब परासार), छोट्या ब्रह्मपुत्रा बेटावर राहणाऱ्या मिशिंग जमातीची आणि बदलत्या हवामान आणि पर्यावरणाने त्यांचे पारंपरिक जीवन आणि जगणे कसे आव्हानात्मक बनवले आहे याबद्दलची ही एक कथा.

‘सालूमारदा थिमाक्का- द ग्रीन क्रूसेडर’ (43 मिनिटे / पी. राजेंद्रन) हा चित्रपट औपचारिक शिक्षण नसलेले कर्नाटकचे स्वयंसिद्ध पर्यावरणवादी सालूमारदा थिमाक्का यांच्यावर आधारित आहे.

सालूमारदा थिमक्का हे जगभरातील पर्यावरणवाद्यांसाठी एक आदर्श  मानले जातात. त्यांनी रस्त्याच्या कडेला शेकडो झाडे लावली आहेत.

‘क्लायमेट चेंज’ (14 मिनिटे / पी. एल्लाप्पन) ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलाच्या धोक्यांवरील चित्रपट.

‘माय सन निओ’ (15 मिनिटे / इंग्रजी / एस. शन्मुगनाथन) या चित्रपटात, नैसर्गिक वातावरणामध्ये वाढलेला, सर्व प्राण्यांवर प्रेम करणारा आणि इतरांसाठी एक उदाहरण ठेवणाऱ्या एका पाच वर्षांच्या मुलाची कथा आहे.

आणि ‘प्लॅस्टिक वर्ल्ड’ (7 मिनिटे / संगीत / पौशाली गांगुली), भविष्यातील विस्तृत आणि शुष्क अद्भुत प्रदेशाचे चित्रण करणारा, प्लास्टिक कचरा आणि मानवी जीवनावर तसेच पर्यावरणावर प्लास्टिकच्या घातक परिणामापासून दक्ष ठेवणारा अ‍ॅनिमेशन चित्रपट आहे.

www.filmsdivision.org/ “Documentary of the Week” आणि https://www.youtube.com/user/FilmsDivision येथे 5 आणि 6 जून 2021 रोजी हा महोत्सव  प्रसारीत केला जात आहे.

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content