Homeटॉप स्टोरीउपराष्ट्रपती धनखड यांचे...

उपराष्ट्रपती धनखड यांचे राहुल गांधींना खडे बोल!

घटनात्मक पदावरील व्यक्ती जेव्हा परदेशात जाऊन राज्यघटनेच्या शपथेचा अवमान करते, राष्ट्रीय हिताकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या संस्थांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचवते, तेव्हा जग आपल्यावर हसते, असा टोला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काँग्रेसचे नेते व लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता लगावला.

राजस्थानच्या अजमेरमधल्या केंद्रीय विद्यापीठात काल एका मेळाव्याला संबोधित करताना धनखड बोलत होते. आपल्या राष्ट्रासाठी योग्य आचरणाला साजेसे नसलेल्या, आपल्या राष्ट्रवादाला चालना न देणाऱ्या कृती करण्याची आपण कल्पनादेखील करू शकतो का? आपल्या विरोधकांच्या महत्त्वाकांक्षेसाठी काम करण्यापेक्षा राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्यावर त्यांनी भर देण्याची गरज आहे. देशहिताविरोधात काम करणाऱ्यांना इतिहासाने कधीही माफ केले नाही, असेही ते म्हणाले.

राहुल

राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिकेच्या दौऱ्यात भारताची प्रतीमा मलिन होईल, अशा स्वरूपाचे भाष्य केले होते. त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भारतीय जनता पार्टीच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींवर सडकून टीका केली होती. याचा पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी केलेल्या भाष्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेऊनही काही लोक देशाला त्रास देत आहेत आणि राष्ट्रवादाशी तडजोड करत आहेत. हे घृणास्पद, निंदनीय, दोषास्पद देशविरोधी वर्तन आहे. कोणत्याही परिस्थितीत आपण आपल्या शत्रूंच्या स्वार्थाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, असेही धनखड म्हणाले.

देशाच्या सीमेपलीकडे पाऊल टाकणारा प्रत्येक भारतीय हा आपल्या संस्कृतीचा, आपल्या राष्ट्रवादाचा राजदूत असतो. तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात विरोधी पक्षनेते असलेले वाजपेयी यांनी जागतिक व्यासपीठावर संवेदनशील आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताच्या हिताचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व केले होते. या पदावरील माझे कर्तव्य राजकारण करणे हे नाही. राजकीय पक्षांनी त्यांची स्वतःची कामे करावीत. विचारधारा भिन्न असतील, दृष्टिकोन भिन्न असतील आणि शासनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन भिन्न असेल. पण एक गोष्ट कायम राहिली पाहिजे की राष्ट्र सर्वोच्च आहे. आम्ही राष्ट्रीय भावना दाबू शकत नाही. जेव्हा देशासमोर आव्हाने येतात तेव्हा आपण एकजुटीने उभे असतो. आपला रंग, धर्म, जात, संस्कृती किंवा शिक्षण काहीही असले तरी आपली एकजूट आहे आणि आपण एक आहोत, असे उपराष्ट्रपतींनी अधोरेखित केले.

Continue reading

सरकारी ‘चरणसेवे’चा १ लाख ४० हजार वारकऱ्यांनी घेतला लाभ

आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. या थकवणाऱ्या प्रवासात त्यांच्या पायांना विश्रांती आणि आरोग्यसुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘चरणसेवा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता...

आयुष्मान खुरानाला ‘द अकादमी’चे आमंत्रण!

बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना, ज्यांनी भारतामध्ये आपल्या विघटनात्मक आणि प्रगतीशील सिनेमाच्या माध्यमातून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे, त्यांना यंदा ऑस्कर पुरस्कार प्रदान करणाऱ्या ‘द अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’कडून सदस्यत्वासाठी आमंत्रित करण्यात आले आहे! या प्रतिष्ठित...

आता ‘एटीएम’मध्ये जाऊन झटपट मिळवा ‘हेल्थ रिपोर्ट’!

"हेल्थ रिपोर्ट्स" मिळविण्यासाठी वाट पाहायचा जमाना आता जुना झालाय. "एटीएम"मध्ये जाऊन आपण पैसे काढतो, तितक्याच सहजतेने आणि झटपट आता "हेल्थ रिपोर्ट" मिळू लागले आहेत. राज्य सरकारच्या योजनेमुळे हे शक्य झाले आहे. सध्या नंदुरबार आणि चंद्रपूर जिल्ह्यात "हेल्थ एटीएम" मशीन...
Skip to content