Monday, November 4, 2024
Homeचिट चॅटजवानांच्या कुटुंबियांना विडीसीएफचा...

जवानांच्या कुटुंबियांना विडीसीएफचा हात..

प्रत्येक व्यक्तिला आपले कुटुूंब प्रिय असते. परंतु सैन्यदलातील व्यक्तींना दोन कुटुंबे असतात. पहिले स्वत:चे कुटूंब तर देशातील जनता हे दुसरे कुटूंब.जेव्हा ते सैन्यदलात भरती होतात, तेेव्हा ते आपल्या कुटुंबापेक्षा देशसेवेला अधिक प्राधान्य देत आपले सर्वस्व अर्पण करतात. आपल्या देशाचे रक्षण करताना जेव्हा हेच जवान शहीद होतात अथवा गंभीर जखमी होतात तेव्हा त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात होतो. सरकार आपल्या परीने अशा कुटुंबांच्या पाठीशी उभी राहते. परंतु सरकारच्या काही मर्यादा आहेत. त्यामुळे शहीद व गंभीर जायबंदी झालेल्या कुटुंबांची स्वप्ने त्यांच्या कुटुंबाचे घटक समजुन पूर्ण करण्याचा संकल्प ‘विनायक दळवी चॅरीटेबल फाऊंडेशन’ने (विडीसीएफ) केला आहे. ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ट्रस्टकडून ‘लाख’ मोलाची साथ मिळणार आहे. ट्रस्टला प्रतीक्षा आहे अशा कुटुंबांच्या माहितीची..

सैन्यदलातील जवानांबरोबर लग्नगाठ बांधताना नवविवाहिता अनेक स्वप्नं उराशी बाळगून असते. लग्नाला काही दिवस होत नाहीत तोच जवानाला सीमेवर देशरक्षणासाठी कर्तव्यावर हजर राहवे लागते. गेल्या काही वर्षांमध्ये सीमेवरील घुसखोरी, अतिरेकी हल्ले यांचा सामना करताना अनेक तरुण जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. शहीद झालेल्या अशा सैनिकांची आपल्या कुटुंबाप्रतीची स्वप्ने अपूर्ण राहतात. मग आई-वडिलांची सेवा, पत्नी व मुलांप्रती कर्तव्य असो, ही शहिदांची स्वप्ने काही अंशी का असेना पूर्ण करण्याचा विडीसीएफचा संकल्प आहे.

स्वरमानस, या संस्थेतर्फे मुंबईतल्या शिवाजी पार्क येथे एका गाण्याच्या कार्यक्रमाचे व स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जमा झालेला ‘लाख’ मोलाचा निधी मानसी केळकर यांनी विनायक दळवी चॅरीटेबल फाऊंडेशनकडे सुपूर्द केला. या निधीद्वारे अशा कुटुंबियांची एखादी ईच्छा पूर्ण करुन आनंद देण्याचा विडीसीएफचा प्रयत्न आहे.

योग्य विनियोग व्हावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयात अर्जाचे नमुने व माहिती 13 फेब्रुवारीच्या पत्राद्वारे मेल केली गेली असून 15 मार्च अंतिम तारीख ठरविण्यात आली होती. office@dalvie-foundarion.org ह्या इमेल आयडीवर आपला अर्ज विहित नमुन्यात पोहोचणे अपेक्षित आहे. तेही शक्‍य न झाल्यास कुटुंबाने ९८२०७५७२७४ ह्या नंबरवर WhatsApp मेसेजद्वारे माहिती घेतल्यास शंका निरसन केले जाईल असे विडीसीएफचे अध्यक्ष विनायक दळवी यांनी कळविले आहे. 

Continue reading

आज भाऊबीज (यमद्वितीया)!

आज भाऊबीज. या दिवशी मृत्यूची देवता यम आपल्या बहिणीकडे जेवायला जात असल्याने नरकातील जिवांना या दिवशी नरकयातना भोगाव्या लागत नाही, असे म्हटले जाते. तसेच या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. पुराणकाळापासून चालत आलेल्या या सणाबाबतची माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखाच्या...

दिवाळीत आग लागल्यास फोन करा १०१ किंवा १९१६ क्रमांकावर!

दीपावलीचा मंगलमय सण साजरा करताना नागरिकांनी योग्य दक्षता बाळगावी. दिवाळीत फटाके फोडताना लहान मुलांची जास्त काळजी घ्‍यावी. फटाके रात्री १० वाजेपर्यंत फोडावेत. या काळात आग अथवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास तत्काळ १०१ किंवा नागरी मदत सेवा संपर्क क्रमांक १९१६ यावर...

महागाई शिगेला! ‘आनंदाचा शिधा’ आचारसंहितेच्या कचाट्यात!!

खरंतर महागाईबाबत दिवाळीत लिहिण्यासारखे तसे काही नसतेच! परंतु दोनच दिवसांपूर्वी हिंदू, या वर्तमानपत्राने महागाईबाबत एक संपूर्ण पानभर आरखेन वगैरे देऊन जवळजवळ बत्तीच लावली आहे. 'दोन वेळचे जेवण झपाट्याने महाग होत आहे, तर उत्पन्नात मात्र काहीच वाढ नाही, अशा आशयाचे...
Skip to content