Homeचिट चॅटवैभव गोळे ज्युनियर...

वैभव गोळे ज्युनियर मुंबई श्री तर रेखा शिंदे मिस मुंबई!

भारतात मुंबईला शरीरसौष्ठवाची ताकद बनविताना शरीरसौष्ठवाचा पाया असलेल्या ज्युनियर मुंबई श्री स्पर्धेत अटीतटीच्या संघर्षात जय भवानी व्यायामशाळेच्या वैभव गोळेने बाजी मारली. तसेच महिलांच्या शरीरसौष्ठवात रेखा शिंदेने आपले वर्चस्व दाखविताना मिस मुंबईवर आपले नाव कोरले. ज्युनियर मुंबई मेन्स फिजीक प्रकारात साहिल सावंत विजेता ठरला. मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेत संकेत भरम (४०-५० वर्षे), संसार राणा (५०-६० वर्षे) आणि विष्णू देशमुख (६० वर्षांवरील) यांनी यश संपादले.

मुंबईच्या मालाड पूर्वेला कासम बागेतील दीनदयाल उपाध्याय मैदानावर हजारो शरीरसौष्ठवप्रेमींच्या उपस्थितीत तब्बल पाऊणेदोनशे ज्यूनियर शरीरसौष्ठवपटूंचा थरार रंगला. ओम जय वरदानी ट्रस्ट आयोजित बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेच्या मान्यतेने रंगलेल्या या स्पर्धेत प्रत्येक गटात अत्यंत जोरदार चुरस पाहायला मिळाली. ज्युनियर मुंबई श्रीच नव्हे तर फिजीक प्रकारात खेळाडूंचा लाभलेला प्रतिसाद डोळे विस्फारणारा होता. तसेच मास्टर्स मुंबई श्रीलाही मोठ्या संख्येने स्पर्धक उतरल्यामुळे सर्वच गटात शरीरसौष्ठवाचा थरार अनुभवायला मिळाला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रेखा शिंदेने आपल्या जेतेपदांची मालिका कायम राखताना मिस महाराष्ट्रपाठोपाठ मिस मुंबईचाही मान पटकावला. ममता येझरकर उपविजेती ठरली.

ज्युनियर मुंबई श्रीच्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या लढतीत वैभव गोळेने आयुष तांडेल, साहिल सावंत आणि अर्पण सकपाळचे कडवे आव्हान मोडीत काढले. मास्टर्स मुंबई श्री स्पर्धेतही तगडे खेळाडू उतरल्यामुळे उपस्थित असलेल्या वयस्कर क्रीडाप्रेमींचीही छाती अभिमानाने फुगली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संस्थेचे संस्थापक यशवंत बामगुडे, काशीराम कदम, एकनाथ निवंगुणे, मंडळाचे अध्यक्ष शिवाजी निवंगुणे, वसंत कळंबे, सुनील गोरड, शांताराम निवंगुणे, विजय भोसले यांच्यासह शरीरसौष्टव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर, किट्टी फणसेकर, सरचिटणीस राजेश सावंत, विशाल परब, सुनील शेगडे, राम नलावडे, राजेश निकम यांच्या उपस्थितीत पार पडला.

ज्युनियर मुंबई श्रीचा निकाल:

५५ किलो वजनी गट: १. सिद्धांत लाड (परब फिटनेस), २. दर्शन सावंत (द फ्लेक्स जिम), ३. ऋषिराज दुबे (बोवलेकर जिम), ४. कार्तिक जाधव (ए फिटनेस), ५. साईराज कारकर (प्रशांत फिटनेस)

६० किलो: १. वंश परमार (जय भवानी ),२. जतिन मेश्राम (मासाहेब जिम), ३. श्रवण कुलगुडे (ओम जयवर्धन जिम), ४. सुमित विश्वकर्मा (स्टील बॉडी जिम), ५. विवेक भिसे (फ्लेक्स जिम)

६५ किलो: १. अर्पण सकपाळ (परब फिटनेस), २. सोहम तोरणे (माउंटन जिम), ३. मंथन पाटील (बॉडी वर्कशॉप), ४. ओम मांजलकर (छावा प्रतिष्ठान), ५. दिनेश उतेकर (पारिजात जिम)

७० किलो: १. साहिल सावंत (मांसाहेब जिम), २. यश मोहिते (बॉडी वर्कशॉप), ३. सुरेश रे (गॉडस जिम), ४. दत्ता चव्हाण (परब फिटनेस), ५. अथर्व कांबळे (एस पी फिटनेस)

७५ किलो: १. वैभव गोळे (जय भवानी), २. समर्थ कोथळे (सर्वेश्वर जिम), ३. यश कारंडे (परब फिटनेस), ४. तनिष राठोड (परब फिटनेस), ५. विघ्नेश चव्हाण (फाईन फिटनेस)

७५ किलोंवरील: १. आयुष तांडेल (परब फिटनेस, २. जीवन सपकाळ (परब फिटनेस), ३. नाईस गुप्ता (प्रशिक फिटनेस, ४. रियान कोळी (गुरुदत्त जिम), ५. याकूब सर्वया (मांसाहेब जिम).

ज्युनियर मुंबई श्री: वैभव गोळे

मास्टर्स मुंबई श्री (४० ते ५० वर्षे)-

१. संकेत भरम (परब फिटनेस), २. दीपक कोरी (मांसाहेब जिम), ३. अशोक देवाडिगा (मुकेश पुरव जिम).

मास्टर्स मुंबई श्री (५० ते ६० वर्षे)-

१. संसार राणा (ग्रोवर जिम), २. संतोष रामचंद्रन (मांसाहेब जिम), ३. राजेश करबेको (युनिटी फिटनेस).

मास्टर्स मुंबई श्री (६० वर्षांवरील)-

१. विष्णू देशमुख (गजानन केणी), २. प्रकाश कासले (जय हनुमान), ३. ओनेल डीमेलो (मांसाहेब जिम).

ज्युनिअर मुंबई मेन्स फिजिक:

१. साहिल सावंत (मांसाहेब जिम), २. वंश परमार (जय भवानी), ३. दर्शन सावंत (द फ्लेक्स जिम), ४. आहेरफ बेग (एस जी फिटनेस), ५. ओम मांजलकर (छावा फिटनेस)

मिस मुंबई महिला शरीरसौष्ठव:

१. रेखा शिंदे (महाराष्ट्र पोलीस), २. ममता येझरकर (फोकस फिटनेस), ३. किमया बेर्डे (फ्लेक्स फिटनेस), ४. राजश्री मोहिते (केंझो फिटनेस), ५. लाविना नरोना (वर्कआउट फिटनेस).

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content