Homeहेल्थ इज वेल्थमुंबईतल्या २५ खासगी...

मुंबईतल्या २५ खासगी रुग्णालयात लसीकरण थांबले!

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोविड–१९ प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी मान्यता मिळालेल्या ७१ पैकी २५ खासगी रुग्णालयांत लससाठा संपल्याने आज (दिनांक ८ एप्रिल, २०२१) लसीकरण झाले नाही.

उर्वरित केंद्रांवर सध्या लसीकरण सुरू असून तेथेही उद्या पुरेल इतका लससाठा शिल्लक आहे. लससाठा उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड–१९ लसीकरण मोहिमेंतर्गत महापालिका आणि राज्यशासन यांच्यातर्फे ४९ कोविड लसीकरण केंद्रे तसेच ७१ खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात या सर्व केंद्रांवर मिळून प्रतिदिन सरासरी ४० ते ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते.

बृहन्मुंबई महापालिकेला ७ एप्रिल २०२१पर्यंत एकूण १७ लाख ०९ हजार ५५० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. त्यापैकी, १५ लाख ६१ हजार ४२० लस उपयोगात आल्या. म्हणजेच १ लाख ४८ हजार १३० इतका लससाठा काल (७ एप्रिल २०२१) लसीकरणानंतर शिल्लक होता. शिल्लक साठ्यातील ४४ हजार ८१० इतक्या लस दुसऱ्या मात्रेसाठी (सेकंड डोस) राज्य शासनाच्या निर्देशानुसार राखीव आहे. म्हणजेच एकूण १ लाख ०३ हजार ३२० इतक्या आज (८ एप्रिल २०२१) सकाळी उपलब्ध होत्या. आज (८ एप्रिल २०२१)चे सुमारे ४० ते ५० हजार लसीकरण पूर्ण झाल्यानंतर उद्या (९ एप्रिल २०२१) पुरेल इतका लससाठा उपलब्ध असेल, असे महापालिकेने म्हटले आहे.

Continue reading

राष्ट्रीय महामार्गांवरून आता ओव्हरलोड वाहनेही धावणार सुसाट!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील अतिभारित (ओव्हरलोडेड) वाहनांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणारी कायदेशीर सुधारणा अधिसूचित केली ाहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून अतिरिक्त शुल्क देऊन नियमापेक्षा जास्त माल घेऊन जाण्यास मालवाहतूकदारांना सहज शक्य होणार आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गांवर आता...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ...

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...
Skip to content