Homeपब्लिक फिगरडिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या...

डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या विस्ताराला केंद्राची मंजुरी!

नागरिकांना डिजीटल सेवा प्रदान करण्यासाठी 1 जुलै 2015 रोजी सुरू करण्यात आलेला डिजिटल  इंडिया कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या विस्ताराला नुकतीच मंजुरी दिली. यासाठी एकूण 14,903 कोटी रुपये खर्च येणार आहे.

यामुळे पुढील गोष्टी साध्य होतील:

  1. फ्यूचरस्किल्स प्राइम कार्यक्रमांतर्गत 6.25 लाख आयटी व्यावसायिकांना पुन्हा कुशल बनवले जाईल. तसेच त्यांचे कौशल्य वृद्धिंगत केले  जाईल.
  2. माहिती सुरक्षा आणि शिक्षण जागरूकता टप्पा (ISEA) कार्यक्रमांतर्गत 2.65 लाख लोकांना माहिती सुरक्षेचे प्रशिक्षण दिले जाईल.
  3. युनिफाइड मोबाईल अॅप्लिकेशन फॉर न्यू-एज गव्हर्नन्स (UMANG) ऍप /प्लॅटफॉर्म अंतर्गत 540 अतिरिक्त सेवा उपलब्ध असतील. सध्या उमंगवर 1,700 हून अधिक सेवा उपलब्ध आहेत.
  4. राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटर मिशन अंतर्गत आणखी 9 सुपर कॉम्प्युटर समाविष्ट केले जातील. यापूर्वी तैनात 18 सुपर कॉम्प्युटर व्यतिरिक्त हे कॉम्प्युटर आहेत.
  5. भाषिनी हे कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित बहु-भाषिक अनुवाद साधन (जे सध्या 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे) राज्यघटनेच्या परिशिष्ट  8 मधील सर्व 22 भाषांमध्ये उपलब्ध केले जाईल.
  6. 1,787 शैक्षणिक संस्थांना जोडणाऱ्या नॅशनल नॉलेज नेटवर्क (NKN) चे आधुनिकीकरण.
  7. डिजीलॉकर अंतर्गत डिजिटल दस्तऐवज पडताळणी सुविधा आता एमएसएमई आणि इतर संस्थांसाठी उपलब्ध असेल.
  8. द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांमध्ये 1,200 स्टार्टअपना सहाय्य पुरवले जाईल.
  9. आरोग्य, कृषी आणि शाश्वत शहरे यांबाबत  कृत्रिम बुद्धिमत्तेतील 3 उत्कृष्टता केंद्रे स्थापन केली जातील.
  10. 12 कोटी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सायबर जागरूकता अभ्यासक्रम.
  11. राष्ट्रीय सायबर समन्वय केंद्रासह टूल्सचा विकास आणि 200 हून अधिक साइट्सच्या एकत्रीकरणासह सायबर सुरक्षा  क्षेत्रात नवीन उपक्रम.

आजच्या या घोषणेमुळे भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, सेवा डिजिटली उपलब्ध होतील आणि भारताच्या माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स परिसंस्थेला बळ मिळेल.

Continue reading

पुण्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला मोदी सरकारची मंजुरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने काल दिल्लीत झालेल्या एका बैठकीत पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 (खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला) आणि मार्गिका क्र. 4 ए (नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग) यांच्या कार्याला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र....

ठाण्यात २ ते ४ डिसेंबरमध्ये रंगणार विभागीय खो-खोचा महासंग्राम

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि दी युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे यांच्या आयोजनाखाली, श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त जे. पी. कोळी यांच्या स्मरणार्थ निमंत्रित विभागीय पुरुष व महिला खो-खो स्पर्धेचे आयोजन येत्या २ ते ४ डिसेंबरदरम्यान ठाण्यातल्या युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर...

एकीकृत पेन्शन योजनेच्या पर्यायासाठी उरले फक्त ४ दिवस

केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने 24 जानेवारी 2025. रोजी काढलेल्या परिपत्रकाद्वारे (एफएक्स-1/3/2024-पीआर) पात्र केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एकीकृत पेन्शन योजना स्वीकारण्याच्या पर्यायाबाबत (यूपीएस) अधिसूचित केले आहे. यासाठी पात्र कर्मचारी आणि एनपीएस सदस्यांना सीआरए प्रणालीद्वारे किंवा प्रत्यक्ष अर्जाद्वारे नोडल अधिकाऱ्यांकडे विनंती दाखल...
Skip to content