Homeबॅक पेजमोबाईल कनेक्शन तोडण्यासाठी...

मोबाईल कनेक्शन तोडण्यासाठी ट्राय कोणाशीही संवाद साधत नाही!

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्राय, मेसेजद्वारे अथवा अन्य कोणत्याही स्वरुपात मोबाईल नंबरचे कनेक्शन तोडण्याबाबत ग्राहकांशी संवाद साधत नाही. ट्रायने कोणत्याही अन्य संस्थेला या कामासाठी ग्राहकांशी संपर्क साधण्याचा अधिकार दिलेला नाही. त्यामुळे ट्रायकडून असल्याचा दावा करणारे कोणत्याही प्रकारचे संवाद (कॉल, मेसेज अथवा नोटीस) अथवा मोबाईल नंबरचे कनेक्शन तोडण्याची धमकी, हा संभाव्य फसवणुकीचा प्रयत्न मानला जावा आणि त्याची दखल घेऊ नये, असे आवाहन ट्रायने केले आहे.

ट्राय, अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे अधिकारी असल्याचे भासवून दूरध्वनी कॉल अथवा संदेशाद्वारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार वाढत आहेत. फसवणूक करणाऱ्यांकडून ग्राहकांना दूरध्वनी कॉल अथवा संदेशाद्वारे लक्ष्य केले जात असून, बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल अथवा पैसे उकळण्यासाठी मोबाईल कनेक्शन (जोडणी) तोडण्याची धमकी दिली जाते. बिलिंग, केवायसी अथवा गैरवापर झाल्याप्रकरणी एखाद्या मोबाईल क्रमांकाचे कनेक्शन तोडण्याचे काम संबंधित टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर (टीएसपी), अर्थात दूरसंचार सेवा प्रदाता करतो. नागरिकांनी सतर्क राहवे आणि संभाव्य फसवणुकीला बळी पडून घाबरून जाऊ नये, असे आवाहनही ट्रायने केले आहे.

संबंधित टीएसपीचे अधिकृत कॉल सेंटर अथवा ग्राहक सेवा केंद्रांशी संपर्क साधून अशा कॉल्सची पडताळणी करावी. सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी, ग्राहकांनी दूरसंचार विभागाच्या संचार साथी व्यासपीठावर चक्षू सुविधेद्वारे संशयास्पद फसवणुकीची तक्रार करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. या व्यासपीठावर प्रवेश करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करावे: https://sancharsaathi.gov.in/sfc/. सायबर गुन्हा झाल्याची खात्री पटल्यावर पीडितांनी ‘1930’ या निर्धारित सायबर क्राइम हेल्पलाइन क्रमांकावर अथवा https://cybercrime.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी, असेही ट्रायने म्हटले आहे.

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content