Homeन्यूज अँड व्ह्यूजउद्या माघी श्री...

उद्या माघी श्री गणेश जयंती!

महत्त्व: गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात; म्हणजेच त्या तिथीला गणपतीची स्पंदने जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेशतत्त्व हे नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर 1000 पटीने कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा जास्त लाभ होतो.

गणेशजयंतीला गणेशतत्वाचा लाभ होण्यासाठी करावयाची उपासना: या दिवशी गणपतीचा भावपूर्ण नामजप 3 ते 9 माळा करण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे गणपतीच्या प्रतिमेचे अथवा मूर्तीचे पूजन केल्यास गणपतीची शक्ति आणि चैतन्य यांचा अधिक लाभ होतो. गणपति अथर्वशीर्ष म्हटल्यासही लाभ होतो.

शुभकार्यात प्रथम गणेशपूजन का करतात?: गणपति हा दिशांचा अधिपति आहे. गणेशपूजन केल्यामुळे दिशा मोकळ्या करतो. त्यामुळे ज्या देवतेची आपण पूजा करीत असतो, ती पूजास्थानी येऊ शकते. गणपति (नाद) भाषेचे देवांच्या (प्रकाश) भाषेत रूपांतर करतो. त्यामुळे मनुष्याच्या प्रार्थना देवतांना कळतात. गणपति हा विघ्नहर्ता आहे.

गणेश

गणपतीचे वाहन: वृ-वह म्हणजे वाहणे यापासून वाहन हा शब्द बनला आहे. देवांचे वाहन हे त्यांच्या कार्यानुसार त्या-त्या वेळी बदलते. उंदीर हे गणपतीचे नित्याचे वाहन, पण त्याची इतरही वाहने आहेत. उदा. युद्धासाठी सिंह. हेरंब गणपतीचे वाहन सिंह, तर मयूरेश्‍वराचे वाहन मोर आहे.

श्री गणेशाची उपासना म्हणून प्रतिदिन खालील गोष्टी कराव्यात: 

1. अथर्वशीर्षाचे पठण: आपल्या वाणीत चैतन्य असले की, आपल्या बोलण्यात गोडवा येतो. अथर्वशीर्षाच्या पठणाने आपले उच्चार स्पष्ट होतात आणि वाणीत गोडवा येतो. यासाठी अथर्वशीर्षाचे पठण करावे.

2. अधिकाधिक प्रार्थना: आपण ज्या भाषेत बोलतो, तिला नादभाषा म्हणतात. इतर देवतांपेक्षा श्रीगणपतीला आपली भाषा अधिक कळते; म्हणून अधिकाधिक प्रार्थना करून त्याची कृपा संपादन करावी.

गणेश

3. मानसपूजा: मानसपूजा म्हणजे मनाने केलेली पूजा. मानसपूजेमुळे मनाला उत्साह मिळतो. याला कोणतेच बंधन नसते. आपल्याला या पूजेद्वारे आपल्या आवडीची वस्त्रे, आवडीची वस्तू देता येते. आपण मनाने सतत श्री गणपतीच्या सहवासात राहून आनंदी राहू शकतो.

संदर्भ: सनातन संस्थेचा ग्रंथ ‘श्री गणपति’

संपर्क क्र. 9920015949 

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content