Homeमुंबई स्पेशलउद्या मुंबईत अनेक...

उद्या मुंबईत अनेक ठिकाणी १० टक्के पाणीकपात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वैतरणा जलवाहिनी दुरूस्तीचे काम उद्या, गुरूवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० ते शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ सकाळी १० वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार असून त्यामुळे या काळात मुंबईतल्या एल व एस विभागात काही परिसरात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद तर काही विभागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. या काळात नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पवई वेन्चुरी येथील अप्पर वैतरणा आणि वैतरणा यामधील ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनी जोडणीमध्ये गळती आढळून आली आहे. ही गळती रोखण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत. सदर गळती दुरुस्तीसाठी मुख्य वैतरणा जलवाहिनी ही समानीकरण बिंदू (equalization point) भांडूप संकुल ते मरोशी बोगदा पर्यंत रिक्त करणे आवश्यक आहे. सदर जलवाहिनी रिक्त करून दुरूस्त करण्याचे काम गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत (२४ तासांकरीता) हाती घेण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे मुंबई महानगरातील शहरातील पाणीपुरवठ्यावर खालील प्रमाणे परिणाम होणार आहे. 

१) ए विभाग- मलबारहिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘ए’ विभागातील सर्व क्षेत्रात ( गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. 

२) सी विभाग- मलबारहिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे ‘सी’ विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. 

३) डी विभाग- मलबारहिल जलाशयातून व थेट पाणीपुरवठा होणारे ‘डी’ विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. 

४) ई विभाग- रेसकोर्स टनेल शाफ्टमधून पाणीपुरवठा होणारे ई विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. 

५) जी उत्तर व जी दक्षिण विभाग- जी/उत्तर व जी/दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व क्षेत्र व वरळी हिल जलाशयातून पाणीपुरवठा होणारे जी/दक्षिण विभागातील सर्व क्षेत्रात (गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल. 

६) एल विभाग– खालील नमुद केलेल्या परिसरांमध्ये गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठा बंद राहील. 

60 कॉर्ड मेन वेन्चुरी सप्लाय-

बीट क्र. १५६ – अप्परतुंगा, लोअरतुंगा, मारवा, रहेजा विहार, चांदिवली फार्म रोड, साकी विहार रोड, साकीनाका, इत्यादी

बीट क्र. १५७ – राम बाग रोड, चांदिवली फार्म रोड, नाहर अमृतशक्ती, आय.आर.बी. रोड, महिंद्रा क्वारी, विजय फायर रोड, संघर्ष नगर, इत्यादी

बीट क्र. १५८ – खैराणी रोड, मोहिली पाईप लाईन रोड  

७) *एस विभाग* – खालील नमूद परिसरात गुरूवार दिनांक ४.०१.२०२४ रोजी दुपारी १२.०० ते दुपारी ०४.०० वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्ण बंद राहील.

 आय.आय.टी.पवई क्षेत्र (रामबाग)-

म्हाडा जलवायू विहार, राणे सोसायटी, हिरानंदानी पवई, पंचकुटीर, तिरंदाज गावठाण, साईनाथ नगर, गोखले नगर, गरीब नगर, चैतन्य नगर, महात्मा फुले नगर, मोरारजी कंपाऊंड, रमाबाई नगर, हरीओम नगर, स्वामी नारायण नगर, गौतम नगर, इंदिरा नगर इत्यादी.  

८) एच पूर्व विभाग- एच/पूर्व विभागातील सर्व क्षेत्रात गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.  

९) एच पश्चिम विभाग- एच/पश्चिम विभागातील सर्व क्षेत्रात  गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत २४ तासांकरीता पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.  

या प्रस्तावित कामामुळे गुरूवार दिनांक ०४.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते शुक्रवार दिनांक ०५.०१.२०२४ रोजी सकाळी १०.०० पर्यंत वर नमूद केल्याप्रमाणे विभागात पाणीपुरवठा होईल, तसेच काही ठिकाणी पाण्याचा दाब कमी राहील. ह्या पाणीकपाती दरम्यान जलाशयातील पातळी लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास विभागवार पाण्याच्या वेळेत बदल करण्यात  येईल. या कालावधीत पाण्यााचा जपून वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Continue reading

टिपू सुलतानप्रकरणी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची दिलगिरी

भारतीय जनता पार्टीने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवल्या. मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि टीपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याचा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा...

अजितदादांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा!

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ तसेच युवा...

‘काळा घोडा’ महोत्सवात मुंबई महापालिकेचे बचत गट मालामाल

मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या...
Skip to content