Homeटॉप स्टोरीउद्यापासून ऑलिम्पिक! हॅश...

उद्यापासून ऑलिम्पिक! हॅश टॅग अभियान सुरू!!

जगभरातील क्रीडाप्रेमी उत्कंठतेने प्रतीक्षा करत असलेला ऑलिम्पिक सोहळा अगदी काही तासांवर येऊन ठेपला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या संध्याकाळी 4:30 वाजेपासून उद्‌घाटन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतल्या भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आजपासून “हमारा विक्‍टरी पंच” हॅश टॅग अभियान
चालू केले आहे.

कोविड-19 संकटामुळे भव्यदिव्य उद्‌घाटन सोहळ्याऐवजी साधेपणाने हे उद्‌घाटन होणार आहे. प्रत्येक देशाचे सहा अधिकारी उद्‌घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असतील. साधेपणाने उद्‌घाटन सोहळा होणार असला तरी टोक्यो स्टेडियम ऑलिम्पिकसाठी पूर्णपणे सज्ज आहे.

यंदा प्रथमच भारताचे तब्बल 127 खेळाडू या स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. भारतीय क्रीडापटू तिरंदाजी, ऍथलेटीक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, घोडेस्वारी, तलवारबाजी (फेन्सिंग), गोल्फ, जिमनास्टीक्स, हॉकी, ज्युदो, रोईंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस, टेनिस, भारोत्तोलन आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आहेत. भारतीय खेळाडूंच्या या चमूत 68 पुरुष आणि 52 महिला खेळाडू, 58 अधिकारी  आणि  प्रशिक्षक, टीम अधिकारी यांच्याशिवाय 8 तात्पुरत्या स्वरुपाचे अधिकारी असा ताफा आहे.

#HumaraVictoryPunch अभियान

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत असलेल्या भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढविण्यासाठी देशाच्या विविध भागांतून शुभेच्छा संदेश येत आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही टोक्यो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी “हमारा विक्‍टरी पंच” हे  हॅश टॅग अभियान सुरू केले आहे.

या अभियानांतर्गत अनुराग ठाकूर यांनी भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी “हमारा विक्‍टरी पंच”संदर्भात एक व्हिडिओ बनवून पाच व्यक्तींना टॅग केले आहे. त्यांनी कायदा व न्यायमंत्री किरेन रिजिजू, क्रिकेटपटू वीरेंदर सेहवाग, अभिनेता अक्षय कुमार, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांना टॅग केले आहे.

भारतीय खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जनतेनेसुद्धा आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत व्हिडीओ बनवून “हॅश टॅग हमारा विक्‍टरी पंच” शेअर करावा तसेच इतर व्यक्तींना टॅग करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content