Homeमुंबई स्पेशलयंदाही २० जुलैलाच...

यंदाही २० जुलैलाच वाहू लागला तुळशी तलाव!

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा मुंबईतलाच पालिकेचा तुळशी तलाव आज, २० जुलैला सकाळी ८.३० वाजता पूर्ण भरुन वाहू लागला आहे. गेल्या वर्षीदेखील २० जुलै २०२३ रोजीच मध्यरात्री १.२८ वाजताच्या सुमारास हा तलाव भरुन वाहू लागला होता.

८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारणक्षमता असणारा हा तलाव २०२२ व २०२१मध्ये १६ जुलैलाच ओसंडून वाहू लागला होता. त्‍याआधीच्‍या वर्षी म्‍हणजेच २०२०मध्‍ये २७ जुलैला तुळशी तलाव ओसंडून वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम १८७९मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी तेव्हा सुमारे ४० लाख रुपये खर्च आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ सुमारे १.३५ चौरस किलोमीटर असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा ८०४.६ कोटी लीटर (८०४६ दशलक्ष लीटर) असतो. तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी विहार तलावाला जाऊन मिळते.

Continue reading

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...

१ ऑगस्टपासून मंत्रालयाचा प्रवेश होणार पूर्णपणे डिजिटल!

येत्या १ ऑगस्टपासून मुंबईतल्या मंत्रालयातला अभ्यागतांचा प्रवेश पूर्णपणे डिजिटल होणार आहे. महाराष्ट्राचे मंत्रालय अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्णपणे डिजिटल होईल. १ ऑगस्टपासून, कागदावर आधारित सर्व प्रकारचे पास टप्प्याटप्प्याने बंद केले जातील आणि डिजिटली ओळख पटवून अभ्यागतांना मंत्रालयात प्रवेश दिला जाईल. राज्याच्या डिजिटल...
Skip to content