Homeबॅक पेजपाणी नाही तिथे...

पाणी नाही तिथे टँकर मिळणारच!

राज्याच्या ज्या भागात पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे, तिथे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. एकाही तालुक्यात किंवा खेड्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये पाऊस पडून पाणी उपलब्ध होईपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना मुख्य सचिव आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत केली.

टँकर

राजेश टोपे आणि जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या विषयावर बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, आपल्या राज्यात साधारणपणे जून महिन्यात पाऊस पडतो. त्यामुळे ३० जूनपर्यंत टँकर सुरु ठेवण्यात येतात. परंतु अद्यापही राज्याच्या काही भागात पाऊस पडलेला नाही. तिथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा तालुक्यात किंवा गावात ३० जूननंतरही टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात येतील. राज्यातील कुठल्याही खेड्यात पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल.

Continue reading

साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांची सहा महिन्यातच बदली!

राज्यातील साखर आयुक्तपदातील सावळागोंधळ सुरूच आहे. साखर आयुक्त सिद्धराम सालिमठ यांचीही सहा महिन्यातच बदली करण्यात आली आहे. काल उशिरा जारी आदेशानुसार, त्यांची मुंबईत कोकण विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी राज्याचा ऊसगाळप हंगाम सुरू असतानाच फेब्रुवारीमध्ये...

शनिवारपासून मुंबईतली मोनोरेल तात्पुरती बंद!

मुंबई मोनोरेल भविष्यासाठी अधिक सुरक्षित, जलद आणि विश्वासार्ह बनवण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) येत्या 20 सप्टेंबर 2025पासून मोनोरेलची सेवा काही काळासाठी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात, नवीन "रोलिंग स्टॉक" (रॅक), प्रगत सीबीटीसी सिग्नलिंग...

1 ऑक्टोबरपासून रेल्वे बुकिंगसाठी पहिल्या 15 मिनिटांत आधार अनिवार्य

आरक्षण प्रणालीचा लाभ सर्वप्रथम सामान्य वापरकर्त्यांपर्यंत पोहोचावा आणि गैरवापर करणाऱ्या घटकांकडून होणारा वापर टाळ्याकरीता येत्या 1 ऑक्टोबर 2025पासून, रेल्वेच्या सामान्य आरक्षणाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 मिनिटांत, आरक्षित सामान्य तिकीट फक्त आधार-प्रमाणित वापरकर्त्यांद्वारेच केले जाऊ शकेल. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम...
Skip to content