Thursday, November 7, 2024
Homeमुंबई स्पेशलमुंबई पथविक्रेता समितीच्या...

मुंबई पथविक्रेता समितीच्या १० जागांसाठी उमेदवारच नाही!

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मुंबई नगर पथविक्रेत्यांची १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी गुरुवारी, २९ ऑगस्टला निवडणूक होणार आहे. या समित्यांच्या सदस्यपदासाठी निवडणूक लढवण्यास पात्र २३७ उमेदवारांची अंतिम यादी मंगळवारी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. अंतिम २३७ उमेदवारांपैकी १९० पुरुष तर ४७ महिला उमेदवार आहेत. शिखर समितीसह सातही परिमंडळांच्या मिळून एकूण ६४ जागांपैकी १० जागांवर एकही उमेदवार नाही तर १७ जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्यामुळे या १७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. 

केंद्र शासनाच्या पथविक्रेता अधिनियमांतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता नियमातील तरतुदींच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक तसेच समन्वयन अधिकारी (फेरीवाला धोरण) यांच्या निर्देशांनुसार, नगर पथविक्रेता समिती गठीत करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ५ ऑगस्टपासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 

नगर पथविक्रेता शिखर समितीसाठी एकूण ३३ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये अनुसूचित जाती- ३,  इतर मागासवर्ग- ४, अल्पसंख्यांक (महिला राखीव)- २, दिव्यांग (महिला राखीव)– २, सर्वसाधारण गट (खुला)- १९, सर्वसाधारण गट (महिला राखीव)- ३ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती या प्रवर्गाकरिता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त न झाल्यामुळे ही जागा तूर्त रिक्त राहणार आहे.

परिमंडळ-१मधील नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ४१ अंतिम उमेदवार आहेत. परिमंडळ- २मधील निवडणुकीसाठी एकूण ४० अंतिम उमेदवार आहेत. परिमंडळ- ३मधील निवडणुकीसाठी एकूण २४ अंतिम उमेदवार आहेत. परिमंडळ- ४मधील नगर पथविक्रेता समितीच्या निवडणुकीसाठी एकूण ३३ अंतिम उमेदवार आहेत. परिमंडळ- ५मधील निवडणुकीसाठी एकूण २७ अंतिम उमेदवार आहेत. परिमंडळ- ६मधील निवडणुकीसाठी एकूण २२ अंतिम उमेदवार आहेत. परिमंडळ- ७मधील निवडणुकीसाठी एकूण १७ अंतिम उमेदवार आहेत.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत नगर पथविक्रेता मतदारांची एकूण संख्या ३२ हजार ४१५ आहे. त्यामध्ये परिमंडळ- १मधील ७ हजार ६८६, परिमंडळ- २मधील ५ हजार ३०३, परिमंडळ- ३मधील ४ हजार ६६८, परिमंडळ- ४मधील ७ हजार ५०१, परिमंडळ- ५मधील २ हजार १६०, परिमंडळ- ६मधील ३ हजार ०३३, परिमंडळ- ७मधील २ हजार ०६४ मतदारांचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी गुरुवारी, २९ ऑगस्टला सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत मतदान होणार आहे. याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर मतमोजणी होईल.

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content