Homeमाय व्हॉईसमोरबी पूल दुर्घटनेतील...

मोरबी पूल दुर्घटनेतील पीडितांचे थेट पंतप्रधानांनाच साकडे!

आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री नेहमीच सांगत असतात की भारतीय जनता पक्ष भ्रष्टाचाराची मुळीच गय करणार नाही. चांगलेच आहे. पण शेजारच्या व खुद्द पंतप्रधानांच्या गुजरातमध्ये काही असे घडताना दिसत तरी नाही. आपल्याला माहीतच असेल की गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात मोरबी पूल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत 135 जण दगावले होते व 100हून अधिक माणसे गायब झाली होती. या पुलाच्या निकृष्ट कामाचा आरोप ठेवून ओरेवा ग्रुपचे कार्यकारी संचालक जयसूख पटेलना अटक करण्यात आली होती.

जयसुख पटेल अद्यापी अटकेतच आहेत. गेल्या आठवड्यात न्यायालयात झालेल्या सुनावणीच्यावेळी एक संतापजनक गोष्ट घडली व ती म्हणजे अतिरिक्त महाअधिवक्ता मितेश अमीन यांनी सरकारी बाजू मांडण्यासाठी तोंडच उघडले नाही. यामुळे कोर्टरूममध्ये एकच सन्नाटा निर्माण झाला. न्यायमूर्तींनी मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुनावणीच पुढे ढकलली. ऍड मितेश अमीन यांच्या मौन व्रतामुळे संतापलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी तसेच इतरांनी या वकिलांना ताबडतोब बदलण्यात यावे, अशा मागणीचे पत्र पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा यांना पाठविले. या पत्राची प्रत मुख्यमंत्री व गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनाही देण्यात आली आहे.

पंतप्रधान

या सुनावणीच्या वेळी सरकारी वकील आणि सरकारच्या कायदा विभागाने गप्प राहण्याचे ठरवले होते असे खात्रीलायकरित्या समजते. आपण जामीनअर्जाचा निर्णय न्यायालयावरच सोडू, असा जणू अलिखित करार झाल्याचे न्यायालय आवारात बोलले जात आहे. सरकारी वकिलांच्या गप्प बसण्याने आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला असे नमूद करून नातेवाईक म्हणतात की, या दुःखद घटनेबाबतच्या सरकारी दृष्टीकोनाने आम्हाला अतीव दुःख झालेले आहे. या प्रकरणात सरकारने पीडिताची बाजू मांडण्यात कुचराई केली असून याची चौकशीच झाली पाहिजे.

केंद्र व राज्य सरकारने दुर्घटना झाली तेव्हा पीडिताना सर्वतोपरी मदत करू तसेच बांधकाम कंत्राटदारावर कडक कारवाई करू असे आश्वासन दिलेले होते, याची आठवणही या पत्रात करून देण्यात आलेली आहे. जाता जाता एक आठवले म्हणून … “It was a privilege to stand beside police officers, sheriffs and agents as government pleader and support their mission to protect our communities ” अशा प्रकारचे वर्तन सरकारी वकिलांकडून अपेक्षित असताना असे विपरीत घडलेच कसे??

Continue reading

पोलीस आयुक्त देवेन भारती.. एक नजर इधर भी…

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन यंदाच्या जानेवारी ते ऑगस्टमधील शहरातील गुन्हेगारीचा आलेख व पोलिसांची कामगिरी विषद केली. खरंतर अशा पत्रकार परिषदा घेऊन पोलीस, जनता व पत्रकारांध्ये माहितीचे आदानप्रदान होणे महत्त्वाचे असते. पूर्वी अनेक...

गणरायही गुदमरले रेल्वेस्थानक परिसरातल्या या प्रचंड गर्दीने!

सरकारी व रेल्वे खात्याच्या आकडेवारीच्या आधारे विचार केला तर ठाणे रेल्वेस्थानकातून दररोज सुमारे पाच ते सहा लाख प्रवासी ये-जा करीत असतात. प्रवासी नागरिकांबरोबरच स्थानक परिसरात असलेल्या लाखो फेरीवाल्यांमुळे आधीच हैराण झालेल्या प्रवाशांच्या हालात परिसरातच मोठा मंडप घालून सार्वजनिक गणपती...

मुंढेंच्या कारवाईविरूद्ध न्यायालयाचे अर्थशून्य ताशेरे! बहोत नाइंसाफी है यह…

तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध विभागाचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून संपूर्ण राज्यभर एकच हलकल्लोळ माजला आहे. भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. औषध नियंत्रण नियमावलीचे पालन न करणाऱ्यांचे तर आता पितळ उघडे पडत आहे. अधूनमधून कारवाईचा दणका बसलेली...
Skip to content