Homeमुंबई स्पेशलमुंबईत आता डबेवाले...

मुंबईत आता डबेवाले पोहोचवणार महिला बचतगटांची उत्पादने

मुंबईतील महिला बचतगटांची उत्पादने डबेवाल्यांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका एक ॲप्लिकेशन विकसित करणार आहे. यासंदर्भात मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मुंबईतल्या डबेवाल्यांच्या प्रतिनिधींशी नुकतीच चर्चा केली.

मुंबईतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच उत्पादनांच्या मार्केटिंग आणि ब्रॅंडिंगसाठी ॲप्लिकेशन विकसित करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे. महिला बचतगटांनी उत्पादने ऑनलाईन पद्धतीने पोहोचवण्यासाठीची यंत्रणा ॲपच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. या ॲपमध्ये समाविष्ट असणाऱ्या उत्पादनांसाठी एक विशिष्ट गुणवत्ता परीक्षण, दळणवळण व्यवस्था आदी सगळ्या निकषांची पूर्तता करणाऱ्या उत्पादनांचा समावेश असावा. उत्पादने घरोघरी पोहोचवण्यासाठी मुंबईतील डबेवाल्यांची यंत्रणा सोबत घ्यावी, तसेच अधिक सक्षम नेटवर्क वापरण्याची गरज डॉ. शिंदे यांनी डबेवाल्यांच्या प्रतिनिधींना सांगितले. महिला बचतगटांची उत्पादने संपूर्ण मुंबईत पोहोचवण्यासाठी डबेवाला संघटनेने संमती दिली आहे.

मुंबईतील सुमारे दहा हजार महिला बचतगटांसोबत एक लाखांहून अधिक महिला विविध प्रकारच्या वस्तू आणि उत्पादने तयार करत आहेत. त्यामध्ये खाद्यपदार्थांपासून इतर तयार केलेल्या वस्तुंचा समावेश आहे. या उत्पादनांना चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून पालिकेचा नियोजन विभाग ॲप विकसित करण्याची कार्यवाही करीत आहे. ॲप विकसित करण्यासाठी पालिकेने एस.एन.डी.टी. विद्यापिठासोबत सामंजस्य करारही केला आहे. या विद्यापिठाच्या इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून ॲप्लिकेशन विकसित करण्यात येणार आहे. या सर्व प्रयत्नांतून महिला बचतगट तसेच मुंबई डबेवाला संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ही उत्पादने घरोघरी पोहोचवण्याचा उद्देश असल्याची माहिती पालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. प्राची जांभेकर यांनी दिली.

या ॲपमध्ये उत्पादने तयार करतानाची महिलांची छायाचित्रे आणि व्हिडिओ यांचा समावेश असेल. अत्यंत प्रभावीपणे ही उत्पादने घरोघरी पोहोचतील यासाठी ॲपमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात येतील. त्यासोबतच महिला बचतगटांच्या उत्पादनाचे चांगले ब्रॅंडिंगही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बचतगट उत्पादनांना घरोघरी पोहोचवण्यासाठी डबेवाल्यांची यंत्रणा वापरण्यात येणार आहे. त्याअनुषंगानेच ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.  

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content