Homeमुंबई स्पेशलकोल्हापूरकरांच्या मदतीला मुंबई...

कोल्हापूरकरांच्या मदतीला मुंबई महापालिका धावली!

मुसळधार पावसामुळे कोल्हापूरमध्ये उद्भवलेल्या पूरपरिस्थितीनंतर त्याठिकाणी जनजीवन सुरळीत करण्याच्या अनुषंगाने शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे स्वच्छ करण्यासाठी मुंबईहून कोल्हापुरात दाखल झालेल्या चमूकडून कामाला सुरूवात झाली आहे.

कोल्हापूरमध्ये पर्जन्य जलवाहिन्या वाहिन्यांच्या स्वच्छतेसाठी कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी बॄहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. कोल्हापूर शहरातील स्वच्छतेसाठी दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर यंत्राची मदत देण्याची विनंती त्यांनी या पत्राद्वारे केली होती. त्यानुसार पालिकेने तातडीने स्वच्छतेच्या कामासाठी चमू रवाना करण्यात आला. या चमूने कोल्हापुरातील शाहूपुरी भागात काम सुरू केले आहे.

कनिष्ठ अभियंता आकाश रैनाक यांच्या नेतृत्त्वाखाली दोन सक्शन कम जेटिंग विथ रिसायकलर संयंत्रे कोल्हापूरकरीता काल रवाना केली गेली. या चमूमध्ये प्रत्येक संयंत्रासोबत चार जणांचे मनुष्यबळ आहे. दोन्ही संयंत्रांसोबत एकूण ८ जण कोल्हापुरात आज दाखल झाले आहेत. या चमूमध्ये वाहनचालक, तंत्रज्ञ, कामगार यासारख्या मनुष्यबळाचा समावेश आहे.

सन २०१९, २०२१मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली होती.    

Continue reading

सुहास खामकरचा ‘राजवीर’ ८ ऑगस्टला चित्रपटगृहात!

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुप्रसिद्ध बॉडीबिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख भूमिका असलेला "राजवीर" हा हिंदी चित्रपट येत्या ८ ऑगस्टला संपूर्ण भारतात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. बलदंड व्यक्तिमत्त्व असलेल्या सुहास खामकरच्या रुपानं हिंदी चित्रपटसृष्टीला नवा नायक या चित्रपटाच्या...

धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने विद्वय पलुस्कर संगीत सभा अंतर्गत धनंजय जोशी यांचे गायन येत्या रविवारी, १० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महेश कानोले तबला तर श्रीनिवास आचार्य संवादिनीवर...

आयटी उद्योग बेंगळुरुला जाईपर्यंत पालकमंत्री झोपले होते का?

काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बेंगळुरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबूल केले. पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार झोपा काढत होते काय? असा प्रश्न...
Skip to content