Homeमाय व्हॉईसभारतात खेळण्यांच्या आयातीत...

भारतात खेळण्यांच्या आयातीत 52% घट तर निर्यातीत 239% वाढ!

भारतीय खेळणी उद्योगाने आर्थिक वर्ष 2014-15 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2022-23मध्ये उल्लेखनीय वाढ नोंदवली असून आयातीत 52% घट तर निर्यातीत 239%ने वाढ झाली आहे. देशांतर्गत बाजारात उपलब्ध असलेल्या खेळण्यांच्या एकंदरीतच दर्जात सुधारणा झाली आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या विनंतीवरून, भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) लखनौद्वारे केलेल्या “स्वदेशी खेळण्यांची यशोगाथा” या विषयावरील विशिष्ट अभ्यासामध्ये ही निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत.

सरकारच्या प्रयत्नांमुळे भारतीय खेळणी उद्योगासाठी, अधिक पोषक उत्पादनव्यवस्था  निर्माण करण्यात मदत झाली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 2014 ते 2020 या 6 वर्षांच्या कालावधीत, या समर्पित प्रयत्नांमुळे उत्पादन कंपन्यांची संख्या दुप्पट झाली आहे, आयात करण्यात येणाऱ्या कच्च्या मालावरील अवलंबित्व 33% वरून 12%पर्यंत कमी झाले आहे, एकूण विक्रीमूल्यात 10च्या चक्रवाढ वार्षिक वृद्धीदराने (सीएजीआर) वाढ झाली आहे आणि एकंदर श्रम उत्पादकतेत वाढ नोंदवण्यात आली आहे.

देशांतर्गत उत्पादित खेळण्यांसाठी संयुक्त अरब अमिरात आणि ऑस्ट्रेलियासह शून्य-शुल्क बाजार प्रवेशासह जागतिक खेळणी मूल्य साखळीत देश एकीकृत झाल्यामुळे भारत सर्वोच्च निर्यातदार राष्ट्र म्हणून उदयास येत आहे, असे विश्लेषण अहवालात करण्यात आले आहे. जगातील सध्याच्या खेळण्यांचे केंद्र, म्हणजे चीन आणि व्हिएतनामसाठी भारताला एक व्यवहार्य पर्याय म्हणून स्थान देण्यासाठी, तंत्रज्ञानातील प्रगती, ई-वाणिज्यचा अवलंब, भागीदारी आणि निर्यातीला प्रोत्साहन, ब्रँड-उभारणीमध्ये गुंतवणूक करणे, शिक्षक आणि पालकांचा मुलांशी संवाद, सांस्कृतिक विविधतेचे जतन आणि प्रादेशिक कारागिरांसह सहयोग यांसारखे सातत्यपूर्ण सहयोगात्मक प्रयत्न खेळणी उद्योग आणि सरकारकडून केले जाणे आवश्यक आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या मुद्द्यांवर काम करण्यासाठी आणि भारतीय खेळणी उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी,  धोरणात्मक कृती आराखडा आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने, सरकारने आधीच एनएपीटी अंतर्गत उपाययोजना सुरू/ हाती घेतल्या आहेत.

देशांतर्गत उत्पादकांच्या प्रयत्नांसह सरकारच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे भारतीय खेळणी उद्योगाची उल्लेखनीय वाढ झाली आहे.

Continue reading

आसाम-बंगालची निवडणूक फळली? पेट्रोल-डिझेलची दरवाढ नाही!

पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साईज ड्युटी) कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी संभाव्य वाढ आणि त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत निर्माण होणारी महागाईची स्थिती रोखण्यासाठी...

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात; ३५ वर्षीय बालेन शाह पंतप्रधान!

नेपाळमध्ये नव्या युगाची सुरुवात झाली असून ३५ वर्षीय बालेन्द्र शाह (बालेन) यांनी शुक्रवारी नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. काठमांडूचे माजी महापौर आणि प्रसिद्ध रॅपर ते राजकारणी असा थक्क करणारा प्रवास करणाऱ्या बालेन शाह यांनी सार्वत्रिक निवडणुकीत...

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी झाल्या निवडचाचण्या जाहीर

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत चालवण्यात येत असलेल्या 'मिशन लक्ष्यवेध'अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवडप्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत...
Skip to content