Homeमुंबई स्पेशलमुंबईला पाणीपुरवठा करणारा...

मुंबईला पाणीपुरवठा करणारा चौथा तलावही वाहू लागला!

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा ज्या ७ तलावांमधून केला जातो, त्यापैकी मोडक-सागर हा चौथा तलाव काल, गुरूवारी रात्री १०.५२ वाजता ओसंडून वाहू लागला. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी मोडक-सागर हा तलाव भरुन ओसंडून वाहू लागणारा यंदाच्या पावसाळ्यातील चौथा तलाव ठरला आहे. या तलावाची कमाल पाणी साठवण क्षमता १२,८९२.५ कोटी लीटर (१,२८,९२५ दशलक्ष लीटर) इतकी आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.

मोडक-सागर तलाव गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२२ मध्ये १३ जुलै रोजी दुपारी ०१.०४ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्यापूर्वी म्हणजेच सन २०२१ मध्ये २२ जुलै रोजी मध्‍यरात्री ०३.२४ वाजता, वर्ष २०२० मध्‍ये १८ ऑगस्‍ट रोजी रात्री ०९.२४ वाजता, वर्ष २०१९ मध्ये २६ जुलै रोजी भरुन वाहू लागला होता. तर त्यापूर्वी सन २०१८ व २०१७ असे दोन्ही वर्ष हा तलाव १५ जुलै रोजी आणि सन २०१६ मध्ये ०१ ऑगस्ट रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सर्व तलावांमध्‍ये आज पहाटे ६.०० वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्‍ये ९८,५१३ कोटी लीटर (९,८५,१३० दशलक्ष लीटर) इतका म्हणजेच ६८.०६ टक्‍के एवढा पाणीसाठा आहे. यंदाच्‍या पावसाळयात तुळशी तलाव भरून वाहू लागलेला पहिला तलाव ठरला आहे. विहार तलाव आणि तानसा तलाव बुधवारी भरून वाहू लागले आहेत.

Continue reading

१५ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेत ‘एसआयईएस’ विजेती

गोरखनाथ महिला संघ आयोजित व गौरी शंकर क्रीडा मंडळाच्या सहकार्याने महिला दिनाचे औचित्य साधून मुंबईत आयोजित केलेल्या १५ वर्षांखालील शालेय मुलींच्या कबड्डी स्पर्धेत एसआयईएस शाळेने विजेतेपद पटकावले. कुर्ला येथील गांधी मैदानात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात एसआयईएस शाळेने...

नवनिर्वाचित खासदार वडकुते यांचा के. रवि यांच्या हस्ते सत्कार

राज्यसभेवर नुकतीच निवड झालेल्या रामराव वडकुते यांचा भव्य सत्कार मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात नुकताच उत्साहात पार पडला. इंडिया मीडिया लिंक अँड इव्हेंट्स मॅनेजमेंट, मुंबई यांच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कंपनीचे संचालक...

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या नूतनीकरणासाठी शासनाकडून ४२ कोटी!

पिपल्स एज्युकेशन सोसायटीच्या फोर्ट, मुंबई येथील सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र महाविद्यालयाला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी त्यांनी ४२ कोटी मंजूर केले असल्याचे जाहीर केले. गेल्या वर्षी मुंबईतील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे आयोजित केलेल्या संस्थेच्या...
Skip to content