Homeडेली पल्सतुम्ही वापरलेला पहिला...

तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर पडून!

ईश्वर सर्वव्यापी आहे, तसेच प्लास्टिकही आज सर्वव्यापी झाले असून हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या सखोल भागापर्यंत प्लास्टिक पोहोचले आहे. तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजदेखील जमिनीच्या पोटात कोठेतरी पडून आहे. त्यामुळे प्लास्टिक वस्तू व प्लास्टिक आवरणामुळे होणारे प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे भारतातील प्रमुख बाळकृष्ण पशुपती यांनी केले.

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण विभागातर्फे ‘प्लास्टिक उत्पादने व प्लास्टिक पॅकेजिंग आवरणांचा पर्यावरणावरील दुष्परिणाम’ या विषयावर काल आयोजित तज्ज्ञांच्या मुंबईत येथे झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.

टूथब्रश

महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनीही या चर्चासत्राला संबोधित केले. देशात दरवर्षी ३४ लाख टन प्लास्टिक कचरा तयार होत आहे. त्यापैकी ४० टक्के प्लास्टिक शेवटी नदी, नाले व भूगर्भात जात आहे. नद्या व समुद्रात प्लास्टिक गेल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. प्लास्टिक प्रदूषणामुळे मत्यव्यवसाय, पर्यटन व आरोग्याला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकला योग्य तो पर्याय शोधावा लागेल. प्लास्टिकचे प्रदूषण कमी करण्यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल, असे राज्यपाल म्हणाले. स्वच्छ पाणी व स्वच्छ पर्यावरणाशिवाय विकसित भारताचे लक्ष्य गाठता येणार नाही. प्लास्टिकपासून पर्यावरणाला होणारा धोका लक्षात घेऊन कॉर्पोरेट, उद्योग, नीती निर्माते या सर्वांना या कार्यात पुढाकार घ्यावा लागेल व त्यासाठी विद्यार्थी, युवक व समाजाच्या इतर सर्व घटकांमध्ये जागरुकता निर्माण करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.   

रिझर्व्ह बँकेची शाश्वत वित्तपुरवठ्याची योजना असून त्यामाध्यमातून पर्यावरण रक्षणाच्या कार्याला वित्तपुरवठ्याच्या माध्यमातून चालना दिली जात असल्याचे बँकेचे कार्यकारी अध्यक्ष आर. केशवन यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते ‘वर्क इन प्रोग्रेस: रिड्युसिंग द प्लास्टिक फूटप्रिंट ऑफ प्रॉडक्ट्स अँड पॅकेजिंग’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. बैठकीला विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य शाश्वतता अधिकारी तसेच या क्षेत्रातले तज्ज्ञ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content