Homeमुंबई स्पेशलमुंबईतल्या पुलाखाली साकारले...

मुंबईतल्या पुलाखाली साकारले पहिले उद्यान ग्रंथालय

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ उत्तर विभागाच्या वतीने नानालाल डी. मेहता पुलाखालच्या मोकळ्या जागेत नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ (Open Library) सुरू करण्यात आले आहे. या सुविधेअंतर्गत नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याठिकाणी वाचनासाठी नि:शुल्क पुस्तके उपलब्ध असतील. सहायक आयुक्त (एफ उत्तर विभाग) डॉ. पृथ्वीराज चौहान यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे काल उद्घाटन करण्यात आले. यावेळी गबुला फाऊंडेशन, इनरव्हील संस्था यांचे प्रतिनिधी, नागरिक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. एखाद्या पुलाखालील जागेवर तयार करण्यात आलेले हे मुंबईतील पहिले उद्यान आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने एफ उत्तर विभागाच्या वतीने २०१६मध्ये नानालाल डी. मेहता उद्यान नर्मदा परिक्रमेच्या धर्तीवर विकसित करण्यात आले आहे. एखाद्या पुलाखालील जागेवर तयार करण्यात आलेले हे मुंबईतील पहिले उद्यान आहे. सुमारे ६ हजार ३४ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या या उद्यानामध्ये नागरिकांसाठी ९०० मीटर लांबीचा पदपथ, योगाभ्यास आणि बसण्यासाठी विशिष्ट आसनव्यवस्था तसेच

ग्रंथालय

आसपास शोभिवंत झाडे लावण्यात आलेली आहे. यासोबतच आता या ठिकाणी नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क ‘मुक्त ग्रंथालय’ सुरू करण्यात आले आहे. या ग्रंथालयामध्ये विविध साहित्यविषयक पुस्तके, महापुरुषांची आत्मचरित्रे, सामान्य ज्ञान, खेळ आदी विषयांवर आधारित पुस्तके ठेवण्यात आली आहेत. सद्यस्थितीत या ठिकाणी एकूण १३२ पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. नागरिक ही पुस्तके कपाटातून घेऊन तिथेच बसून वाचू शकतात. हे ग्रंथालय सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 

 विरंगुळा आणि करमणुकीसोबतच ज्ञानार्जन आणि वाचनाची सवय वृद्धींगत होण्याच्या अनुषंगाने नानालाल डी. मेहता उद्यानात हे ग्रंथालय सुरू करण्याचे आले आहे. नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चौहान यांनी केले आहे.

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content