Thursday, March 6, 2025
Homeमुंबई स्पेशलदादरच्या 'छबिलदास'ची वास्तू...

दादरच्या ‘छबिलदास’ची वास्तू उद्या करणार शंभरीत प्रवेश!

एखादी संस्था नव्हे तर एखाद्या शाळेची वास्तू जेव्हा शंभराव्या वर्षात पदार्पण करते तेव्हा त्या शाळेला त्या वास्तूला तेथील आजी / माजी शिक्षक, विद्यार्थी, हितचिंतक समाजाला होणारा आनंद हा केवळ शब्दातीत असतो. याच आनंदात सहभागी होण्याचं, “याची देही याची डोळा” पाहण्याचे सौभाग्य उद्या मुंबईतल्या दादरच्या ‘छबिलदास’वासियांना मिळणार आहे.

‘जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट’ संचालित दादरची छबिलदास शाळा नुकतीच शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहे. याचे औचित्य साधून संस्थेने उद्या, मंगळवारी दिनांक १२ मार्च २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थोचे अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर भूषविणार असून प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे माजी विद्यार्थी प्रसिद्ध अभिनेते बाळ धुरी व कळसुत्री बाहुल्यांचे निर्मितीकार रामदास पाध्ये यांच्या उपस्थितीत होणार आहे.

या सोहळ्यानिमित्त आनंदाची पर्वणी म्हणजे संस्थेतील कला शिक्षकांच्या चित्रांचे प्रदर्शन तसेच ‘छबिलदास कल्चर सेंटर’चे उद्घाटन व समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांच्या व्यक्तिगत व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारी ‘छबिलदास वॉल’ यांचे आयोजन व उद्घाटन संपन्न होणार आहे. या सोहळ्यास जास्तीजास्त लोकांनी उपस्थित राहण्याचे आग्रहाचे आमंत्रण संस्थेचे कार्याध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी दिले आहे.

Continue reading

‘आरडी’तलं धमाल गाणं ‘वढ पाचची..’ लाँच

एका चुकीमुळे आयुष्य बदलणाऱ्या कथानकावरील 'आरडी' चित्रपटाच्या टीजरनं चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता या चित्रपटातलं "वढ पाचची.." हे धमाल गाणं लाँच करण्यात आलं असून, २१ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. "वढ पाचची" हे अतिशय धमाल...

चेंबूरमध्ये रंगला मल्लखांब, जिमनॅस्टिक्स खेळाडूंचा कौतुकसोहळा

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मल्लखांब आणि जिमनॅस्टिक्स खेळात चमकदार कामगिरी करण्याऱ्या, तसेच राष्ट्रीय जिमनॅस्टिक्स स्पर्धेतदेखील पदके जिंकण्याऱ्या खेळाडूंचा कौतुक सोहळा शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार अनिल देसाई यांच्या पुढाकाराने मुंबईतल्या चेंबूर येथील नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता. उत्तराखंड...

राज्य मंत्रिमंडळात छगन भुजबळांना ‘नो एन्ट्री’च!

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना काल डच्चू दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या त्यांच्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता नसल्याचे माहितगारांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीच्या कोट्यातले हे मंत्रीपद तूर्तास रिक्तच ठेवले जाणार असून अगदी गरज भासल्यास...
Skip to content