Homeमुंबई स्पेशलपालिकेच्या आक्रमक धोरणामुळे...

पालिकेच्या आक्रमक धोरणामुळे मालमत्ता करधारक धास्तावले!

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहीर करताच अनेकांचे धाबे दणाणले आहे. करनिर्धारण आणि संकलन खात्याचे पथक भेटीला येताच करदाते धनादेश (चेक), धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सोपवित आहेत तर, काहीजण  विहीत मुदतीत करभरणा करण्याचे आश्वासन देत आहेत. दरम्‍यान, नागरिकांनी वेळेत करभरणा करून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.

मालमत्ता

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मालमत्ता कर थकबाकी असणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षाचा कर आणि थकीत करभरणा करावा यासाठी करनिर्धारण आणि संकलन खात्याने जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. थकबाकी व चालू आर्थिक वर्षाचा करवसुलीसाठी अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. करदात्यांना मायकिंगद्वारे, दर्शनीय ठळक बॅनरद्वारे तसेच स्थानिक केबलद्वारे जनजागृती करून ३१ मार्च २०२४पर्यंत करभरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

नागरिकांनी त्यांचा मालमत्ता कर ३१ मार्च २०२४पर्यंत पालिकेकडे जमा करावा, याकरिता अधिकारीवर्ग प्रत्यक्षात करदात्यांना भेटून त्यांना मालमत्ता कराचा भरणा करण्यास प्रोत्साहित करत आहेत. नागरिकांना करदेयके विहित कालावधीत टपालामार्फत प्राप्त न झाल्यास पालिकेच्या संकेतस्थळावरुन अथवा विभाग कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.

मेसर्स भारत डायमंड फोर्स आणि गोदरेज ग्रीन होम्स लिमिटेड यांनी २५ मार्च २०२४ रोजी नियमित करभरणा करण्याचे आश्वासित केले आहे. ते थकबाकीदार नसून प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये वेळेत करभरणा करतात. ते त्यांचा चालू आर्थिक वर्षाचा कर ३१ मार्च २०२४ पूर्वी भरून पालिकेला सहकार्य करणार आहेत, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॉपटेन मालमत्ता करधारकांनी आश्वासित केलेली यादी

१) न्यू दाऊद बाग १८ कोटी १५ लाख ३३ हजार ८४३

२) मेसर्स फिनिक्स मॉल १७ कोटी ६० लाख ७८ हजार ५९२

३) न्यू दाऊद बाग १० कोटी ९९ लाख ३२ हजार ६५९

४) एच. एम. मॉल, श्री ग्रुप १० कोटी ६१ लाख ७ हजार ३०८

५) वोक्हार्ड रूग्णालय ८ कोटी ४७ हजार १८५

६) सुप्रिम बिझनेस पार्क ८ कोटी ८ लाख ६२ हजार ३१६

७) आयओरी प्रॉपर्टीज इन ऑरर्बीट मॉल ७ कोटी ७२ लाख ३५ हजार ३७०

८) एक्सप्रेस झोन २ कोटी ७० लाख २५ हजार ३२८

९) आनंद राज इंडस्ट्रीयल २ कोटी ५८ लाख ८८ हजार ८१९

१०) हॉटेल लिला व्हेन्टायर २ कोटी २७ लाख ६७ हजार ३८७

Continue reading

ट्विटने युद्ध थांबवता येत नाही! इराणने ट्रम्पना सुनावले!!

युद्ध सुरू करणे सोपे आहे. ट्विटने ते थांबवता येत नाही. अमेरिकेला याची किंमत मोजावीच लागेल, अशा शब्दांत इराणचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अली लारीजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काल रात्री सुनावले. कालच इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह मोजतबा खामेनेई...

तेलसंकटावर अमित शाह समितीचा उतारा! भारतासाठी ‘होर्मूझ’ मोकळा!

आखातात सुरू असलेल्या अमेरिका-इराण संघर्षामुळे निर्माण झालेल्या तेलसंकटावर मार्ग काढण्याकरीता केंद्र सरकारने गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली एक त्रिसदस्यीय समिती गठित केली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर तसेच पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी या समितीचे अन्य दोन सदस्य आहे....

गोळीबारात थोडक्यात बचावले डॉ. फारूक अब्दुल्ला!

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तसेच नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारूक अब्दुल्ला काल रात्री झालेल्या गोळीबारात थोडक्यात बचावले. जम्मूमध्ये हॉटेल सोहेल पार्क येथील एका लग्नसमारंभातून बाहेर पडताना कमल सिंह जम्वाल नावाच्या एका इसमाने पाठीमागून डॉ. अब्दुल्ला यांच्या डोक्यात गोळी...
Skip to content