Homeचिट चॅट१८व्या 'जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट...

१८व्या ‘जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले’ मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक्स असोसिएशन आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा प्रायोजित १८व्या “जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले” मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात भारतीय क्रीडा मंदीर, वडाळा, मुंबई येथे नुकत्याच संपन्न झाल्या. ८, १०, १२, १४ व १६ वर्षांखालील वयोगटात झालेल्या मुला-मुलींच्या या स्पर्धेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील १०००पेक्षा जास्त खेळाडूंनी भाग घेतला. या जिल्ह्यांतील खेळाडूंनी “२० फ्लोअर सेट”वर आपल्या कौशल्याचे सादरीकरण करून सर्व उपस्थितांची शाबासकी मिळवली.

या स्पर्धेत जास्तीतजास्त खेळाडू सहभागी झालेल्या आय ई एस, ओरायन (दादर), अजय जिम क्लब, लोअर परळ व चिल्ड्रन्स अकॅडमी ग्रुप ऑफ स्कूल (मालाड) या संस्थांचा विशेष गौरव करण्यात आला. श्रीराज शिंदे, युवान जगताप, रुद्र धायगुडे, साईशा सिंग, गार्गी बापये व अस्मा खान-देशमुख यांनी शानदार सादरीकरण करुन सर्वांची वाहवा मिळविली. सहभागी सर्व

खेळाडूंना श्रेणी सहभाग प्रमाणपत्र, पदक देऊन गौरविण्यात आले. संजय शेटे, महासचिव, महाराष्ट्र ऑलपिक असोसिएशन, अध्यक्ष महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना, शिवछत्रपती पुरस्कारविजेते मंगेश इंगळे (खेळाडू), राहुल ससाणे (प्रशिक्षक), ऋग्वेद जोशी (खेळाडू) व डॉ. राजेंद्र ढाकणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या जिमनॅस्टिक खेळाडूंनी रिद्धमिक व आर्टिस्टिक जिमनॅस्टिकची सुंदर प्रात्यक्षिके सादर करून सर्वांची मने जिंकली.

दीपक शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा, डॉ. जी. के. ढोकरट, प्राचार्य, शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांनी स्पर्धेला भेट दिली. जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. दीपक शिंदे, खजिनदार डॉ. राजेंद्र शेळके, स्पर्धा प्रमुख देवेंद्र पाटील, डॉ. किशोर मारू, रवींद्र विसपुते, प्रकाश जावळे, प्रेमानंद नाईक व सोनाली सावंत यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अथक मेहनत घेतली.

Continue reading

कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर राज्यमंत्रीपदही जाईल…

मी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर मला राज्यमंत्रीपदही सोडावे लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. या वाक्याचे स्पष्टीकरणही लगेचच त्यांनी केले. केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये असलेल्या लहान पक्षांच्या प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांच्या पक्षाचे दोन-चार खासदार निवडून...

तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर पडून!

ईश्वर सर्वव्यापी आहे, तसेच प्लास्टिकही आज सर्वव्यापी झाले असून हिमालयाच्या शिखरापासून समुद्राच्या सखोल भागापर्यंत प्लास्टिक पोहोचले आहे. तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश आजदेखील जमिनीच्या पोटात कोठेतरी पडून आहे. त्यामुळे प्लास्टिक वस्तू व प्लास्टिक आवरणामुळे होणारे प्रदूषण कमी करणे ही काळाची गरज...

इराणमधील भारतीयांना तातडीने देश सोडण्याचे आदेश! नवी ॲडव्हायझरी जारी!!

इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव आणि नुकत्याच घोषित झालेल्या दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामाचा (सीझफायर) फायदा घेऊन, केंद्र सरकारने इराणमध्ये वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आवाहन केले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालय आणि तेहरानमधील भारतीय दूतावासाने यासंदर्भात...
Skip to content