Homeबॅक पेजठाणे एक्साईजच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे...

ठाणे एक्साईजच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे विनाशुल्क ग्रंथालय कार्यरत

ठाणे कोपरी येथील राज्य उत्पादनशुल्क (एक्साईज) विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दररोजच्या शासकीय कामांसह स्वखर्चाने महाराष्ट्रातील पहिले सुसज्ज ग्रंथालय उभारण्याची कमाल केली आहे. या ग्रंथालयात तब्बल २०००हून जास्त निवडक पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयात कायदे, शासकीय कायद्यांची (जीआर) माहिती यासाठी लागणारी पुस्तके आणि विविध कादंबरी, ऐताहासिक पुस्तकेदेखील या आगळ्यावेगळ्या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत.

पहिल्या मजल्यावरील या ग्रंथालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ज्ञानात पुस्तके वाचून भर पडणार आहे. उत्पादन शुल्क हे राज्यातील महत्त्वाचे खाते आहे. या खात्यामार्फत अवैध दारूनिर्मिती आणि अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायदे व नियमांचे ज्ञान असणे आवश्यक आहे, यावर जास्त कटाक्ष आहे.

आपला कर्मचारी कायद्याचा उत्तम अभ्यासक असावा, आरोपींवर कारवाई करताना त्यांना कायद्याचा पुरेपूर वापर करता यावा. एवढ्यावर न थांबता, अधिकारी आणि कर्मचारीवर्गाला वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याच्या ज्ञानात अधिकाधिक भर पडण्याच्या हेतूने या ग्रंथालयाची उभारणी केली आहे, असे एक्साईज विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी सांगितले.

कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सहकार्याने या ग्रंथालयात ‘शारदा’ची मेढ उभारली आहे. या ग्रंथालयात मुंबई दारूबंदी कायदा, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, अनुसूचित जाती/जमाती प्रतिबंध कायदा, बाल न्यायालय अधिनियम, आयपीसी, सीआरपीसी आदींसह बहुतांश सर्व प्रकारच्या कायद्यांची पुस्तके येथे ठेवण्यात आली आहेत.

एक्साईजने फडकवला पहिल्या ग्रंथालयाचा झेंडा

सर्व कर्मचाऱ्यांना ग्रंथालयात बसूनच ही पुस्तके वाचता येणार आहेत. त्यासाठी शून्य शुल्क आकारले जाणार आहे. पुस्तकेसुद्धा कर्मचारी व अधिकारी यांच्या वर्गणीतून घेण्यात आली आहेत. काही पुस्तकप्रेमींनीदेखील या ग्रंथालयाला पुस्तकांचे दान केले आहे. शासकीय निधीला हात न लावता हे ग्रंथालय उभारण्यात आले असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने पहिल्या ग्रंथालयाचा झेंडा फडकवला आहे. ग्रंथालयात विविध कायद्यांची पुस्तके, प्रसिद्ध कादंबरीकारांच्या विविध गाजलेल्या कादंबऱ्या ठेवल्या आहेत. येथे सर्व प्रकारची शासकीय परिपत्रके उपलब्ध आहेत. या परिपत्रकांचा संग्रह करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी लागला. परीक्षेला बसणाऱ्या व कर्मचाऱ्यांना तयारीसाठी लागणारी आवश्यक पुस्तकेही येथे ठेवली जाणार आहेत.

विभागातल्या कार्यालयीन इमारतीच्या जागेचा योग्यप्रकारे वापर करून एका खोलीमध्ये हे ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. सर्व कर्मचाऱ्यांच्या मदतीने महिन्याभरापूर्वी ग्रंथालय सुरू झाले आहे. येथे बसून पुस्तके वाचण्याची व्यवस्थाही सर्वोत्तमप्रकारे केली आहे. अलिकडेच उपलब्ध असलेली माहिती संकलन करण्यासाठी तसेच गुगलच्या माध्यमातून नवनवीन अत्याधुनिक माहिती मिळवण्यासाठी संगणकदेखील ठेवले आहेत, अशी माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content