डीआरडीओ म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने काल ओदिशाच्या किनाऱ्यावरील चांदीपूर येथून अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणालीच्या सलग तीन उड्डाणचाचण्या यशस्वीरित्या पार पाडल्या. खूप कमी उंचीवर उडणाऱ्या, अतिशय गतिमान लक्ष्यांवर या चाचण्या करण्यात आल्या.
तिन्ही उड्डाणचाचण्यांदरम्यान, संरक्षक क्षेपणास्त्रांनी वेगवेगळ्या उड्डाण परिस्थितीत कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोनप्रमाणे कमी ‘थर्मल सिग्नेचर’सह लक्ष्यांना रोखले आणि पूर्णपणे नष्ट केले. उड्डाणचाचण्या अंतिम तैनातीसाठी असलेल्या बाह्यस्वरूपामध्ये घेण्यात आल्या. यावेळी प्रत्यक्ष क्षेत्रावरील ऑपरेटर्सनी शस्त्रसज्जतेसह लक्ष्य हेरून क्षेपणास्त्रांचा मारा केला.
ही एक ‘मॅन पोर्टेबल’ हवाई संरक्षणप्रणाली आहे जी इमरत या संशोधन संस्थेने इतर डीआरडीओ प्रयोगशाळा आणि विकास सहउत्पादन भागीदारांच्या सहकार्याने स्वदेशी पद्धतीने डिझाइन आणि विकसित केली आहे. या क्षेपणास्त्रप्रणालीमध्ये भारतीय लष्कर, नौदल आणि हवाईदल या सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांच्या गरजा पूर्ण करण्याची क्षमता आहे.