Homeपब्लिक फिगरअपघात कमी करण्यासाठी...

अपघात कमी करण्यासाठी महामार्गावरील दूरसंचार नेटवर्क महत्त्वपूर्ण!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री जनरल (निवृत्त) डॉ व्ही के सिंह म्हणाले की, रस्त्यांचा वापर करणाऱ्यांना उत्तम सेवा पुरवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर दूरसंचार नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात 4G सेवेची पोहोच सुनिश्चित करण्यासाठी मोबाईल टॉवर्स उभारून 4G सेवा न पोहोचलेल्या गावांमध्ये त्याचा विस्तार करण्याचा उपक्रम सुरू आहे. याचा आपल्या रस्ते नेटवर्कला थेट लाभ होईल, ज्यामुळे आम्हाला अपघात आणि जीवितहानी  प्रभावीपणे टाळता येईल असे त्यांनी सांगितले.

नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत दूरसंचार विभागाची कामगिरी तसेच इतर सर्व मंत्रालये आणि विभागांवर त्यांचा प्रभाव अधोरेखित करत ते म्हणाले की राष्ट्रीय महामार्गांवर विनाव्यत्यय अखंडित मोबाइल फोन नेटवर्क सुनिश्चित करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय दूरसंचार विभागाशी समन्वय साधत आहे.

भारतात 5G नेटवर्कचा विस्तार वेगाने होत आहे. अंदाजे 1 लाख साईट्स 5 महिन्यांत पूर्ण झाल्या, त्यानंतर 8 महिन्यांत 2 लाख आणि 10 महिन्यांत 3 लाख साईट्स पूर्ण झाल्या, ज्याचा आपल्या रस्त्यांच्या नेटवर्कला मोठा लाभ होईल असे डॉ. सिंह म्हणाले. याशिवाय, आम्ही टोलिंग प्रणाली उपग्रह आणि कॅमेरा-आधारित बनवत आहोत. दिल्‍ली-मेरठ द्रुतगती मार्गावर उपग्रह आधारित तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे अडथळे रहित टोलिंगची अंमलबजावणी करण्‍यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू आहे. ऑप्टिकल फायबर नेटवर्क सुधारण्यावरही आम्ही काम करत आहोत असे त्यांनी नमूद केले.

मोबाईल टॉवर प्रकल्पांसाठी एकूण खर्च 43,868 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 631 जिल्ह्यांमध्ये 5G सुरु केले आहे असे डॉ सिंह म्हणाले. बीएसएनएलच्या पुनरुज्जीवन पॅकेजबद्दलही त्यांनी माहिती दिली.

Continue reading

श्रद्धा और सबुरी! दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग!!

दिल्लीहून शिर्डीच्या दिशेने निघालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाला मंगळवारी खराब हवामानामुळे गुजरातमध्ये सूरत विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावी लागली. विमानात १५०पेक्षा जास्त प्रवासी होते. शिर्डी विमानतळावर जोरदार वारे आणि अत्यंत कमी दृश्यमानता असल्याने लँडिंग अशक्य झाल्यावर पायलटने विमान सुमारे एक तास...

अश्विनी भिडे झाल्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त!

देशातील सर्वात मोठी आणि सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) आयुक्तपदी 'मेट्रो वुमन' म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांची नियुक्ती मंगळवारी जाहीर करण्यात आली. निवृत्त होत असलेले आयुक्त भूषण गागराणी यांच्याकडून भिडे यांनी पदभार स्वीकारला आहे....

राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रवींद्र जडेजा झाला भावूक!

गुवाहाटीत काल संध्याकाळी खेळल्या गेलेल्या राजस्थानविरुद्धच्या सामन्यादरम्यान मैदानावर चाहत्यांचा प्रतिसाद पाहून रवींद्र जडेजा भावूक झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, रवींद्र जडेजा खलील अहमदचे चुंबन घेत असलेला एक व्हिडिओही सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. आयपीएल २०२६साठी राजस्थान...
Skip to content