Homeकल्चर +छबिलदास प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून...

छबिलदास प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून ‘टिचिंग एड्स’

मुंबईतल्या दादर येथील छबिलदास प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांनी बनविलेल्या टिचिंग एड्स या साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन साहित्यिका अंजना कर्णिक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

४ते ९ वर्षे वयाच्या मुलांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून आणलेली, टाकाऊ वस्तूंपासून बनवलेली शैक्षणिक साधने स्पर्धेसाठी मांडण्यात आली होती. त्या चिमुरड्या मुलांनी भेट देणाऱ्या प्रत्येक मान्यवरांना आत्मविश्वासाने आपल्या प्रकल्पाची माहिती दिली. सौर ऊर्जा, सौर वीज, जल ऊर्जा, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, ग्राम स्वच्छता अभियान, पावसाच चक्र, जल शुद्धीकरण, प्रदूषण नियंत्रणाचे दैनंदिन जगण्यातील मार्ग, सुनियोजित शहरं, आदर्श इस्पितळ, चांद्रयान आणि त्याचे कार्य, सूर्यमाला, बगीचा संवर्धन, स्वप्नातील गाव, धरणं, कालवे आणि खेडी असे अनेक प्रकल्प या शैक्षणिक साधननिर्मिती स्पर्धेत मांडले होते.

मुख्याध्यापिका रॉड्रिक्स यांनी शिक्षकांच्या सहकार्याने सर्व कार्यक्रमाचं उत्तम नियोजन केलं होते. शालेय समिती अध्यक्ष पार्सेकर यांनी जुन्या आठवणी यावेळी संगितल्या. शिक्षण महर्षी म. गो. अक्षीकरांनी स्थापन केलेल्या याच छबिलदास प्रायमरी शाळेत अनेक नामवंत विद्यार्थी शिकले आहेत.

Continue reading

मोहिते चषक कॅरम स्पर्धेत सार्थक केरकर अजिंक्य

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने झालेल्या अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक विनाशुल्क राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा सार्थक केरकर अजिंक्य ठरला. चुरशीच्या अंतिम सामन्यामध्ये सार्थक केरकरने अचूक खेळासह राणीवर सतत कब्जा मिळवित राष्ट्रीय ख्यातीची...

मनाला गुंतवून ठेवणारं कोवळं प्रेमगीत ‘झोका’ प्रदर्शित

प्रेम कधी शब्दांत नाही मावत, ते डोळ्यांत दिसतं, हसण्यात मिसळतं आणि शांततेत गुंजतं. दोन मनं एकत्र येत असताना त्यांच्यातली नाजूकशी चाल, हेच त्या प्रेमाचं खरं संगीत असतं. याच भावनेला स्वरबद्ध करत शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित 'सजना' चित्रपटाचं एक...

किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाखांत लॉन्च

 किया इंडिया या मास-प्रीमियम ऑटोमेकरने ग्राहकांसाठी त्‍यांची बिग, बोल्‍ड फॅमिली वेईकल नवीन किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस ११.४९ लाख रूपयांच्‍या आकर्षक सुरूवातीच्‍या किंमतीमध्‍ये लाँच केली आहे. आधुनिक, मोठ्या कुटुंबांसाठी डिझाइन करण्‍यात आलेली ही प्रीमियम वेईकल एमपीव्‍ही व एसयूव्‍हीमधील तफावत दूर करते....
Skip to content